अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला आहे.
यानंतर जिल्हा प्रशासनाने निर्बंधांचे नवीन आदेश जारी केले आहेत. त्यानुसार आता रात्री ८ नंतर कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही.
सर्व दुकानेही ८ वाजेपर्यंतच बंद करणे अनिवार्य असणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तीच्या हालचालींवर फिरण्यावर रात्री 8.00 ते सकाळी 7.00 याकालावधीत निबंध राहील.
Containment Zone बाहेर मार्केट/ दुकानांमध्ये गर्दीचे नियंत्रण करणे / गर्दी कमी करणे उद्देशाने मार्केट दुकाने रात्री 8.00 ते सकाळी 7.00 या कालावधीत बंद राहतील. पुर्वीचे सर्व आदेश या आदेशासह 15 एप्रिल 2021 पर्यंत लागू राहतील.