मुख्यमंत्र्यांचा इशारा परिस्थिती बिघडू शकते …

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :-सध्या राज्यात हिंगोलीसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक असून दुसऱ्या लाटेचे शेपूट अद्याप कायम आहे.

आरोग्याचे नियम न पाळता नागरिक गर्दी करत असतील तर संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढून परिस्थिती बिघडू शकते असा इशारा देऊन निर्बंध शिथिल करुन घाईघाईने व्यवहार खुले करू नका,असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी दिले.

कोरोना संसर्ग वेगाने वाढत असलेल्या या ७ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी गुरुवारी ते दूरचित्र प्रणालीद्वारे बैठकीत बोलत होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची देखील उपस्थिती होती. डेल्टा प्लेस या उत्परिवर्तित विषाणूचा देखील धोका आहे.

संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पुढील काळात किती जास्तीचे ऑक्सिजन व आयसीयू बेड्स लागतील याविषयी आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना नियोजन करून द्यावे, असे निर्देश ठाकरे यांनी दिले.

बैठकीच्या प्रारंभी राज्याचा पॉझिटिव्हिटी दर ०. १५ इतका कमी झाला आहे मात्र या सातही जिल्ह्यांचा दर त्यापेक्षा दुप्पट-तिप्पट आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts