ताज्या बातम्या

CNG Cars : 4 लाख रुपयांपेक्षा स्वस्त आहेत ‘या’ कार्स, मायलेजही आहे जबरदस्त

CNG Cars : देशात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol and Diesel Rate) वाढत आहेत. अनेकजण सीएनजी कार (CNG Car) खरेदी करू लागले आहेत.

त्यामुळे भारतीय बाजारातही (Indian market) सीएनजी (CNG) कारची मागणी वाढत आहे. या कारच्या किमतीही जास्त आहे परंतु, बाजारात अशाही काही सीएनजी कार आहेत, ज्याची किंमत (CNG Cars Price) 4 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

मारुती अल्टो सीएनजी

मारुती अल्टो सीएनजीची (Maruti Alto CNG) सुरुवातीची किंमत 3.39 लाख रुपये आहे, तर या कारची कमाल किंमत 5.03 लाख रुपये आहे. हा दर एक्स-शोरूम दिल्ली आहे. या कारवर 36000 सूट आहे.

मारुतीच्या दाव्यानुसार, अल्टोच्या सीएनजी मॉडेलमध्ये 31.59 किमीपर्यंत मायलेज देण्याची क्षमता आहे. ही कार 796 cc इंजिनसह सुसज्ज आहे, जी 35.3 kW पॉवर आणि 69 Nm कमाल टॉर्क जनरेट करू शकते.

मारुती सुझुकी एस-प्रेसो सीएनजी

Maruti Suzuki S-Presso CNG ची किंमत (Maruti Suzuki S-Presso CNG Price) 4.25 लाख रुपयांपासून सुरू होते, जी 6.10 लाख रुपयांपर्यंत जाते. ही कार 31.2 किमी मायलेज देऊ शकते. S-Presso मध्ये 1.0-लिटर पेट्रोल इंजिन आहे जे 59 PS पॉवर आणि 78 Nm पीक टॉर्क देते. या कारवर कमाल 56000 रुपयांपर्यंत सूट आहे.

टाटा टियागो सीएनजी

Tata Tiago वर 25,000 रुपयांची सूट दिली जात आहे. यावर्षी या कारची सीएनजी आवृत्ती सादर करण्यात आली. कंपनीची ही कार एकूण 5 प्रकारांमध्ये CNG किटसह येते. Tata Tiago ची सुरुवातीची किंमत 6.30 लाख रुपये आहे आणि कमाल किंमत 7.82 लाख रुपये आहे. या किंमती एक्स-शोरूम, दिल्ली आहेत. ही कार 26 किमीपेक्षा जास्त मायलेज देऊ शकते.

मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजी

मारुती सेलेरियोची किंमत 5.25 लाख ते 7 लाख रुपये आहे. या कारमध्ये 35.6 किमी/किलो मायलेज देण्याची क्षमता आहे. ही कार 998 सीसी इंजिनने सुसज्ज आहे. हे इंजिन 57 hp पॉवर आणि 82.1 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

मारुती वॅगनआर

मारुतीची सीएनजी कार खूप आवडते. ही मारुती सुझुकी वॅगनआर आहे. कंपनी ही कार दोन प्रकारातील CNG पर्यायांमध्ये ऑफर करते, LXI CNG ची किंमत 6.42 लाख रुपये आणि VXI CNG ची किंमत 6.86 लाख रुपये आहे (दोन्ही किंमती एक्स-शोरूम आहेत). याचे मायलेज 34.04 किमी/किलो आहे. या कारवर ऑक्टोबरमध्येही सूट मिळत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts