CNG Price Hike : महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे चांगलेच मोडले आहे. आता अशातच अजून एक महागाईचा फटका बसणार आहे. कारण शनिवारपासून रस्त्यावर वाहन चालवणे लोकांना महाग होणार असल्याची बातमी आहे.
राजधानी दिल्लीत सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. नवीन किमती १७ डिसेंबर २०२२ (सकाळी ६) पासून लागू होतील. यापूर्वी 1 किलो सीएनजीसाठी तुम्हाला 78.61 रुपये मोजावे लागत होते, मात्र वाढलेल्या किमतींनुसार तुम्हाला 1 किलोसाठी 79.56 रुपये मोजावे लागतील, म्हणजेच आता तुम्हाला एक किलोसाठी 95 पैसे अधिक मोजावे लागतील.
याआधी 8 ऑक्टोबर रोजी सीएनजीच्या दरात बदल झाला होता
यापूर्वी 8 ऑक्टोबर रोजी सीएनजीच्या दरात बदल करण्यात आला होता. IGL नुसार, 8 ऑक्टोबर रोजी सीएनजीच्या किमतीत 3 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यानंतर सीएनजीची किंमत 78.61 रुपये प्रति किलो झाली, जी पूर्वी 75.61 रुपये प्रति किलो होती. केंद्र सरकार 1 ऑक्टोबरपासून नैसर्गिक वायूच्या किमती 40 टक्क्यांनी वाढवणार असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे.
उत्पादित गॅसची किंमत सरकार ठरवते
भारतात उत्पादित गॅसच्या किमती सरकार स्वतः ठरवते. त्याची किंमत वर्षातून दोनदा बदलली जाते. पहिला बदल 31 मार्च रोजी तर दुसरा बदल 30 सप्टेंबर रोजी केला जातो.
पहिली दरवाढ १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत, तर दुसरी दरवाढ १ ऑक्टोबर ते ३० मार्च या कालावधीत लागू करण्यात आली आहे. अशाप्रकारे सीएनजीच्या किमती वाढल्याने रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांच्या किमतीत वाढ होऊन लोकांच्या वाहतुकीचा खर्चही वाढू शकतो.