जिल्हाधिकारी म्हणतात ‘यातच’ खरे समाधान आहे!

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- महसूल विषयक कामकाज करतानाच कामासाठी येणारा प्रत्येक नागरिक समाधानाने परत जाईल. यासाठी महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी काम केले पाहिजे.

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणुकीतून मिळणारा आनंद कामाचे समाधान देणारा असतो. मात्र,त्यासाठी महसूलविषयक नियम, कायदे यांचा अभ्यास करुन विषयांच्या खोलाशी जाणे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी केले.

महसूल दिनाचे औचित्य साधून महसूल विभागात विविध संवर्गात चांगले काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा गुणगौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी बोलत होते.

ते म्हणाले, काम करताना अधिकारी, कर्मचारी यांची मानसिकता ही सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणारी असली पाहिजे. अभ्यासपूर्णरितीने काम केले, वस्तुनिष्ठपणे परिस्थिती हाताळली तर प्रश्न सुटून त्याचे समाधान मिळू शकते.

नेमून दिलेली कर्तव्य पार पाडताना कामाचा आराखडा बनवून काम करा. कामे करण्यात दिरंगाई झाली की नकारात्मकता निर्माण होते. ते टाळण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts