दिलासादायक ! वयोमर्यादा ओलांडलेल्यांना स्पर्धा परीक्षेची एक संधी मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- कोरोना काळात शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडून गेली. (Competitive Exams)

पण राज्य सरकारने यावर सहानुभूतीपूर्वक विचार करत कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळ विशेष बाब म्हणून स्पर्धा परीक्षांना बसण्यास मान्यता दिली आहे.

तसा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पसरल्यानंतर जनजीवन ठप्प झाले. तब्बल दोन वर्षांनी कोरोना आटोक्यात येत आहे.

मात्र शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात १ मार्च २०२० पासून जाहिराती प्रसिध्द झाली नव्हती. त्यामुळे शासकीय सेवेत काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडून गेली.

मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहानुभूतीपूर्वक यावर विचार करून १ मार्च २०२० ते शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना विशेष बाब म्हणून स्पर्धा

परीक्षांना बसण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे शासन निर्णयाच्या दिनांकापासून दि. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीत भाग घेता येणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts