Apple WWDC 2022 : अॅपल (Apple) कंपनीने आपल्या इव्हेंटमध्ये अनेक मोठ्या बदलांसह iOS 16 लॉन्च केला. यासोबतच अॅपलने आपले नवीन मॅकबुकही लाँच केले.
नवीन मॅकबुक एअर (MacBook Air) मध्ये M2 प्रोसेसर देण्यात आला आहे.
MacBook Air बद्दल कंपनीने म्हटले आहे की, ते मागील MacBook Air पेक्षा 25% कमी वॉल्यूम घेते. हे उपकरण स्पेस ग्रे (Space gray), स्टारलाइट, मिडनाईट आणि सिल्व्हर कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहे. ऍपलच्या मॅगसेफ (Apple’s MagSafe) ने ते चार्ज केले जाऊ शकते. यात दोन थंडरबोल्ट पोर्ट आहेत.
MacBook Air M2 मध्ये लिक्विड रेटिना डिस्प्ले (Liquid retina display) देण्यात आला आहे. त्यात नॉचही देण्यात आला आहे. त्याची स्क्रीन आकार 13.6-इंच आहे. त्याच्या किनारी खूप पातळ आहेत. त्याचा डिस्प्ले मागील आवृत्तीपेक्षा 25% अधिक उजळ आहे. यामध्ये कंपनीने व्हिडिओ कॉलसाठी फ्रंटमध्ये 1080p कॅमेरा दिला आहे.
यात चार स्पीकर साउंड सिस्टम (Speaker sound system) आहे. यात ऑडिओ कॅप्चर करण्यासाठी तीन माइक आहेत. कीबोर्ड आणि डिस्प्लेमध्ये स्पीकर्स आणि माइक एकत्रित केले आहेत. त्याच्या कीबोर्डमध्ये टच आयडी दिलेला आहे. मात्र त्यात टचबार दिसणार नाही.
यात दोन USB-C पोर्ट आहेत. कंपनीचा दावा आहे की, ते 18 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक देते. हे 67-वॅट अॅडॉप्टरसह फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. याच्या मदतीने 30 मिनिटांत 50 टक्के बॅटरी चार्ज होऊ शकते.
या चिपसेटसह, कंपनीने 13-इंचाचा MacBook Pro देखील लॉन्च केला आहे. यामध्ये टच बारचा सपोर्ट देण्यात आला आहे. हे 20 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक वेळ देते. यासोबत कंपनीने macOS Ventura देखील लॉन्च केले.
MacBook Air M2 ची किंमत शिक्षणासाठी $1199 किंवा $1099 ठेवण्यात आली आहे. MacBook Pro 13″ ची किंमत $1299 पासून सुरू होते. पुढील महिन्यापासून ते विक्रीसाठी उपलब्ध होईल. तसेच MacBook Air M1 ची किंमत $999 ठेवण्यात आली आहे.