ताज्या बातम्या

Bank Holiday 2022 : तातडीने बँकेशी निगडित काम पूर्ण करा, या महिन्यात 8 दिवस बँका राहणार बंद

Bank Holiday 2022 : तुमचे जर या महिन्यात काही बँकेशी निगडित काही काम (Bank work) असेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा. कारण या महिन्यात 8 दिवस बँका बंद (Bank Holiday) राहणार आहे.

RBI ने सुट्ट्यांची यादी (Holiday List) जाहीर केली आहे. ही यादी पाहूनच तुम्ही बँकेत (Bank) जा नाहीतर तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो.

दिलासा देणारी बातमी म्हणजे ऑनलाइन व्यवहार सेवा गुगल पे, फोन पे, पेटीएम, इंटरनेट बँकिंग (Online transfer) सेवा सुरू राहतील, परंतु चेकबुक-पासबुकच्या (Passbook) कामावर परिणाम होऊ शकतो.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीत सर्व राज्यांच्या सुट्ट्यांची यादी वेगळी आहे. या सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू नाहीत. याशिवाय दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवार यांचाही समावेश आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट, रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे आणि बँक्स क्लोजिंग ऑफ अकाउंट्स या बँक सुट्ट्यांच्या यादीमध्ये तीन श्रेणींचा समावेश केला आहे.

September Bank Holiday 2022

9 सप्टेंबर 2022 इंद्रजात्रा – गंगटोकमध्ये बँक बंद
10 सप्टेंबर 2022 शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)
11 सप्टेंबर 2022 रविवार (साप्ताहिक सुट्टी)
18 सप्टेंबर 2022 रविवार (साप्ताहिक सुट्टी)
21 सप्टेंबर 2022 श्री नारायण गुरु समाधी दिन – कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद
24 सप्टेंबर 2022 शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)
25 सप्टेंबर 2022 रविवार (साप्ताहिक सुट्टी)
26 सप्टेंबर 2022 नवरात्री स्थापना / लॅनिंगथौ सन्माही का मेरा चौरे होवा – इंफाळ आणि जयपूरमधील बँका बंद राहतील.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts