ताज्या बातम्या

पंजाब मध्ये काँग्रेसचा सुपडासाफ ! आपची मुसंडी; पहा कुणाला किती जागा मिळाल्या?

पंजाब : पाच राज्यांच्या निवडणुकी निकालाची मतमोजणी सध्या सुरु आहे. देशात काँग्रेसकडे (Congress) एकमेव सत्ता असलेले राज्य म्हणजे ते पंजाब (Punjab)  होते. मात्र आता पंजाब सुद्धा काँग्रेसच्या हातातून निसटताना दिसत आहे.

काँग्रेस पक्षाने पंजाबमध्ये सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केल्याचे दिसले मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले दिसत नाहीये. जवळपास आप (Aap) कडे पंजाब राज्याची सत्ता जाताना दिसत आहे.

आप मुसंडी मारत ११७ पैकी ८८ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर काँग्रेस फक्त १३ जागांवर आघाडी मिळवताना दिसत आहे. जवळपास पंजाबवर आप राज्य करणार हे आता स्पष्ट झाले आहे.

काँग्रेसची पंजाबमध्येही पीछेहाट झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसत आहे. मात्र आप च्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता जवळपास पंजाबमध्ये आप चे सरकार येणार हे निश्चित झाले आहे.

आप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडिया तसेच घरोघरी जाऊन प्रचार केला होता. आप मध्ये तरुण (Young) वर्गाचा उत्साह मोठ्या प्रमाणात होता. तरुण वर्गाचा जल्लोष मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.

उत्तर प्रदेशमध्येही (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी मुसंडी मारली आहे. पुन्हा एकदा उत्तर प्रदेश मध्ये योगी आदित्यनाथ सत्ता राखणार हे आतापर्यंतच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts