ताज्या बातम्या

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा! कांदा खरेदी करण्यासाठी नाफेड आलं रणांगणात; दरवाढ होणार म्हणजे होणार…..!

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2022 Krushi news : कांद्याला बेभरवशाचे पीक म्हणून का संबोधले जाते याचे जिवंत उदाहरण सध्या बघायला मिळत आहे. कारण की दोन महिने अगोदर कांद्याला विक्रमी दर मिळत होता मात्र अवघ्या दोन महिन्यात कांद्याला कुणाची नजर लागली कुणास ठाऊक म्हणुन आता कांदा हा कवडीमोल दरात विक्री होत आहे.

सध्या शेतकरी बांधव (Farmer) उन्हाळी कांद्याची (Summer Onion) काढणी करत असून विक्रीसाठी लगबग करत आहेत.

खरं पाहाता उन्हाळी कांद्याची साठवणूक करता येणे शक्य असते मात्र शेतकरी बांधवांच्या देखील साठवणुकीवर मर्यादा आहेत.

काही शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीसाठी पुरेसे असे साधन नसते. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वच कांदा साठवणूक केला जाणे अशक्य आहे, यामुळे नाईलाजाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Onion Growers) आपला कांदा कवडीमोल दरात विक्री करावा लागत आहे.

यामुळे राज्यातील सर्वच बाजारपेठेत कांद्याच्या आवक मध्ये वाढ झाली आहे. हेच कारण आहे की कांद्याला आता अतिशय कवडीमोल दर मिळत आहे.

मात्र, आता कांदा खरेदी करण्यासाठी नाफेड (NAFED) रणांगणात उतरल आहे. नाफेडच्या माध्यमातून आता कांदा खरेदी (Onion Purchase) करण्यास सुरुवात झाली आहे, यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थोडा का होईना पण दिलासा मिळणार म्हणजे मिळणार.

देशातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ नव्हे नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून नावलौकिक मिळवलेली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत (Lasalgaon Agricultural Produce Market Committee) नाफेडच्या खरेदीचा सकारात्मक परिणाम बघायला मिळत आहे.

लासलगाव एपीएमसीमध्ये दरवर्षी नाफेड कांदा खरेदी करत असते. सध्या नाफेडची कांदा खरेदी सुरू (NAFED starts buying onions) झाली आहे आणि कांद्याच्या भावात दोनशे रुपयांची वाढ झाली आहे.

यामुळे कांदा उत्पादक शेतकरी थोडा सुखावला असल्याचे चित्र जिल्ह्यात बघायला मिळत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, पहिल्याच दिवशी नाफेडने दीडशे क्विंटल कांद्याची खरेदी केली आहे.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नाफेड मार्फत धान्याची खरेदी करुन साठा केला जातो. नाफेड केंद्र सरकार द्वारा चालवण्यात येणारी एक संस्था आहे.

याद्वारे खरेदी केलेला शेतमाल उर्वरीत काळात धान्याची टंचाई निर्माण झाली किंवा वाजवीपेक्षा अधिकचे दर झाले तर उपयोगात आणला जातो.

अर्थातच हा खरेदी केलेला आणि साठवणूक केलेला शेतमाल विक्रीसाठी बाहेर काढला जातो. गेल्या काही महिन्यापूर्वीच कांद्याच्या दरात वाढ होताच हे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने हा साठवणूकीतला कांदा मार्केटमध्ये पाठवून दर नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला होता.

तेव्हा शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. पण आता कवडीमोल दर असतानाच वाढीव दराने नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केली जात आहे.

म्हणजेच नाफेडचे कार्य दरात संतुलन राखणे हे आहे. निश्चितच आता कांद्याला कवडीमोल दर मिळत असताना नाफेडने कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली असल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

कांदा खरेदी करण्यास नाफेड आणि स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये चढाओढ होऊ शकते आणि याचाच फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts