ताज्या बातम्या

Year Ender 2022 : स्वस्तात मस्त! यावर्षी लाँच झाले ‘या’ कंपन्यांचे सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन

Year Ender 2022 : सर्वत्र 5G स्मार्टफोनची चर्चा सुरु आहे. देशात 5G सेवा सुरू होण्यापूर्वीच अनेक कंपन्यांनी 5G स्मार्टफोन्स लाँच केले होते. सध्याही अनेक कंपन्या 5G स्मार्टफोन लाँच करत आहे.

त्यामुळे सर्व कंपन्यांमध्ये कमी किमतीत जबरदस्त स्मार्टफोन उपलब्ध करण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. लवकरच 2022 हे वर्ष संपणार आहे. या वर्षांमध्ये काही कंपन्यांनी आपले कमी किमतीत 5G स्मार्टफोन लाँच केले आहेत. पहा यादी.

Lava Blaze 5G

देशातील हा सर्वात कमी किमतीत मिळणारा 5G स्मार्टफोन आहे. 9,999 रुपयांना तो खरेदी करू शकता. या फोनमध्ये 6.5-इंचाचा HD Plus IPS डिस्प्ले आणि 90 Hz चा रिफ्रेश दर आहे.

या फोनसोबत साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक आहे. या फोनला MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आणि 5000 mAh बॅटरीचा सपोर्ट आहे. तसेच यामध्ये तीन रियर कॅमेरे आहेत ज्यात प्राथमिक लेन्स 50 मेगापिक्सेल आहे आणि दुसरी लेन्स AI आहे. फोनच्या फ्रंटला 8-मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे.

Samsung Galaxy M13 5G

सॅमसंगचा हा फोन तुम्ही 13,999 रुपयांना खरेदी करू शकता. तो Android 12 सह One UI 4 मिळतो. तर यामध्ये 6.5-इंचाचा HD Plus डिस्प्ले आणि 90 Hz रिफ्रेश रेट आहे. फोनला MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आहे. तसेच 4 GB RAM सह 64 GB स्टोरेज आहे.

हा स्मार्टफोन ड्युअल कॅमेरा सेटअप सह येतो. फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा प्राथमिक लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 5 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000 mAh बॅटरीचा सपोर्ट आहे.

Poco M4 5G

एप्रिलमध्ये लॉन्च झालेल्या फोनची किंमत 12,999 रुपये इतकी असून तो Android 12 आधारित MIUI 13 आहे. यात 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.58-इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास 3 चे संरक्षण उपलब्ध असणार आहे. या फोनमध्ये तुम्हाला MediaTek Dimensity 700 प्रोसेसरसह 6 GB पर्यंत रॅम आणि 128 GB पर्यंत स्टोरेज दिले जाईल.

2 GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम उपलब्ध असून यामध्ये दोन मागील कॅमेरे आहेत ज्याची प्राथमिक लेन्स 50 मेगापिक्सेल तर दुसरी लेन्स 2 मेगापिक्सेल पोर्ट्रेट आहे. तसेच कंपनीने सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000 mAh बॅटरी असून 18W फास्ट चार्जिंग उपलब्ध आहे. सुरक्षेसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिले आहे.

iQoo Z6 5G

भारतात हा स्मार्टफोन 13,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये 6 GB पर्यंत रॅमसह 128 GB पर्यंत स्टोरेज आहे. 6.58-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले असून तो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो.

यामध्ये स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर आणि 5000 mAh बॅटरी आहे. याला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो, जो प्राथमिक लेन्स 50 मेगापिक्सेल, 2 मेगापिक्सेल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरसह येतो. फोनमध्ये 18W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे.

Redmi 11 Prime 5G

सप्टेंबरमध्ये हा फोन 3,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केला होता. हा फोन मिडो ग्रीन, क्रोम सिल्व्हर आणि थंडर ब्लॅक अशा 3 पर्यायांमध्ये येतो. सोबत 6.58-इंचाचा फुल एचडी प्लस IPS डिस्प्ले दिला असून जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये Octacore MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी Mali-G57 सपोर्ट आहे.

स्टोरेजचा विचार केला तर यामध्ये 6 GB RAM सह 128 GB UFS 2.2 स्टोरेज आहे. तसेच फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, ज्यामध्ये प्राथमिक कॅमेरा 50 मेगापिक्सेल आणि दुय्यम कॅमेरा 2 मेगापिक्सेल आहे. तर सेल्फीसाठी फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे. फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts