AC Tips : देशात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी पंखा, कुलर किंवा एसी यांचा वापर करत आहेत. परंतु, या वस्तूंचा वापर जास्त असल्यामुळे साहजिकच वीजबिल जास्त येत आहे. त्यामुळे याचा परिणाम अनेकांच्या महिन्याच्या आर्थिक बजेटवर पडत आहे.
खर्च जास्त असल्याने अनेकांचे आर्थिक बजेट कोलमडत आहे. परंतु, तुम्ही आता संपूर्ण उन्हाळा कितीही एसी वापरला तरीही तुम्हाला वीजबिल खूप कमी येईल. त्यासाठी तुम्हाला काही टिप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. त्या टिप्स कोणत्या आहेत पाहुयात सविस्तर.
फॉलो करा या टिप्स
क्रमांक १
जर तुम्हाला एसी चालवताना वीज बिल कमी करायचे असल्यास तुम्ही ऑटो कट फीचर वापरावे. हे फिचर आजकाल ते जवळपास सर्व एसीमध्ये येत आहे. यामध्ये, खोली थंड झाल्यावर एसी आपोआप बंद होत असून जेव्हा खोली गरम होऊ लागते तेव्हा तो पुन्हा चालू होतो. त्यामुळे वीज बिलावर परिणाम दिसून येत आहे.
क्रमांक २
अनेकांना 16 डिग्री सेल्सिअस तापमानात एसी चालवण्याची सवय असते. परंतु तुम्ही असे केल्याने वीज बिल जास्त येऊ शकते हे त्यांना बहुधा माहीत नसावे. त्यामुळे एसी नेहमी 22 ते 24 डिग्री दरम्यान चालला पाहिजे. या पद्धतीमुळे तुमचे वीज बिल खूप कमी होऊ शकते.
क्रमांक ३
या उन्हाळ्यात जर तुम्हीही एसी खरेदी करत असाल, तर हे लक्षात ठेवा फक्त 5 स्टार एसी घ्या. जास्त 5 स्टार म्हणजे कमी वीज बिल येऊ शकते. हे एसी जरा महाग असले पण एकदा पैसे खर्च करून तुम्ही तुमचे वीज बिल ब-याच प्रमाणात कमी करू शकता.
क्रमांक ४
हे लक्षात घ्या की एसी चालवताना सोबत पंखाही चालवू नका. कारण काही लोक एसी आणि पंखा दोन्ही चालू करतात. यामुळे एसीला खोली थंड होण्यासाठी सामान्यपेक्षा खूप जास्त वेळ लागतो, ज्याचा थेट परिणाम वीज बिलावर होतो. त्यामुळे दोन्ही एकत्र चालणे टाळा.