Vivo Smartphone : दिग्ग्ज टेक कंपनी विवो लवकरच आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. Vivo Y100 असे कंपनीच्या आगामी फोनचे नाव असणार आहे. आपल्या वापरकर्त्यांसाठी कंपनी या उत्कृष्ट फीचर्स देणार आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने आपल्या आगामी स्मार्टफोनचा टीझर पोस्ट केला होता.
या फोनच्या मागील बाजूचा रंग बदलणार आहे. दरम्यान हा भारतातला कंपनीचा आणखी एक रंग बदलणारा स्मार्टफोन असणार आहे. हा फोन मार्केटमध्ये कधी येणार? तसेच या फोनची किंमत काय असणार? जाणून घेऊया सविस्तर माहिती.
इतकी असणार Vivo Y100 ची भारतातील किंमत
कंपनीचा Vivo Y100 हा मिडरेंज स्मार्टफोन असणार आहे. यात अनेक उत्तम फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स कंपनीने दिली आहेत. टिपस्टर पारस गुगलानी यांनी या फोनची भारतीय किंमत जाहीर केलीअसून त्यांच्या मते, त्याची किंमत 27 हजार ते 29 हजार रुपयांच्या दरम्यान असू शकते. या फोनच्या लॉन्च बद्दल बोलायचे झाल्यास तो भारतात 4 ते 6 दिवसात सादर केला जाणार आहे. याबाबत कंपनीने फोनचा टीझर शेअर केला आहे.
जाणून घ्या स्पेसिफिकेशन
या फोनचे स्पेसिफिकेशन समोर आले आहेत. हा फोन 90Hz रिफ्रेश रेटसह 6.3-इंचाच्या AMOLED डिस्प्लेसह येतो. फोन डायमेन्सिटी 920 SoC द्वारे समर्थित असून जो 8GB RAM आणि 128GB स्टोरेजसह येतो.
असा असणार कॅमेरा
कंपनीने आपल्या वापरकर्त्यांसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध करून दिला आहे. यात 64MP चा प्राथमिक सेन्सर, 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 2MP डेप्थ युनिट असण्याची शक्यता आहे. या फोनच्या समोर 16MP सेल्फी शूटर असू शकतो. याच्या बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास यात 44W चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी उपलब्ध आहे. हा फोन अँड्रॉइड 12 वर चालेल.