अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- जिल्हयाच्या रुग्ण संख्येत 702 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 4 हजार 586 इतकी झाली आहे. दुसरीकडे संगमनेर तालुक्यातील करोना संसर्ग हटण्याचे नाव घेण्यास तयार नाही.
संगमनेर वगळता इतर तालुक्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. संगमनेरमध्ये ९४३ इतके सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत, असे जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या दैनंदिन अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जिल्ह्यात गुरुवारी ७०२ जण बाधित आढळून आले आहेत. दरम्यान जिल्ह्यात गुरूवारी 823 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
यामुळे करोनामुक्त झालेल्यांची संख्या 3 लाख 8 हजार 264 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.53 टक्के इतके झाले आहे.
जाणून घेऊया जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संक्या