कोरोनाचा कहर ! जिल्हाधिकारी म्हणाले…तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर सुरू करा

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  कोरोनाची तिसरी लाट हळूहळू जिल्ह्यात पसरू लागली आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता

प्रत्येक तालुकास्तरावर कोवीड केअर सेंटर कार्यान्वीत करण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले.

दरम्यान जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची कोरोना विषयक आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात आली‌.

त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी भोसले म्हणाले, “जिल्ह्यातील कोविड रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तेव्हा प्रशासनाने अधिक सतर्क राहून काम केले पाहिजे.

कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव पाहता दररोजच्या चाचण्यांची संख्या नेहमीपेक्षा अधिक वाढविली पाहिजे‌.” दुसरा डोस घेण्यासाठी पात्र असलेल्या पण लसीकरण न केलेल्या लोकांची संख्या काही तालुक्यांमध्ये जास्त आहे.

तेव्हा दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करावे. अशा सूचना ही भोसले यांनी यावेळी दिल्या.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts