जपानमधील रेडक्रॉस हॉस्पिटलमधून सुमारे ६००० सर्जिकल मास्कची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे.
कोरोना नावाच्या आजाराच्या धास्तीमुळे मास्कची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे मास्कची जबरदस्त टंचाई निर्माण झाली आहे .
या आजारापासून बचाव करण्यासाठी अनेक लोकं मास्क खरेदी करत आहेत, मास्कच्या किमतीसुद्धा भरमसाट वाढल्या आहेत.
कोबे शहरातील रेडक्रॉस हॉस्पिटलच्या स्टोअररूममधून मास्कचे मोठे ४ बॉक्स चोरीस गेल्याचे सकाळीच ऑपरेशन थिएटरच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले .
हे मास्क बाजारात महाग दराने विकत असावेत अशी शंका व्यक्त होत आहे .
जपानमध्ये ६५ फेस मास्कच्या एका पॅकेटची किंमत ५०, 000 येन ( सरासरी ४५६ डॉलर ) आहे.