अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-राज्यामध्ये कोविड १९ ची दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर आली आली आहे. शासनानेही कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेने बँकेच्या कामकाज वेळेत बदल केला आहे. २३ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत बँकेचे शाखांचे कामकाज ग्राहकांसाठी कॅश व्यवहार करण्यासाठी सकाळी १०.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत चालणार आहे,
अशी माहिती बँकेचे चेअरमन उदय शेळके व्हॉ.चेअरमन माधवराव कानवडे व मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी दिली.
जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ८५० ते ९०० विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पात्र कर्जदार शेतकरी सभासदांना चालू वर्षाचे जनरल काम मंजूर करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील विविध शाखांद्वारे खरिपाचे पिकांसाठीचे कर्ज वितरण सुरू आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेला दिलेल्या पीक कर्जाची उद्दिष्ट प्रमाणे बँक कर्ज वाटप करणार आहे.
जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना व भगिनींना तसेच बँकेच्या इतर सर्व ग्राहकांना कोविड १९ पासूनचे स्वतःचे संरक्षण करून शाखांमध्ये गर्दी न करता सर्वांनी एकमेकाच्या सहकार्याने बँकिंग कामकाज चालवण्याची विनंती बँकेचे चेअरमन शेळके यांनी केली. बँ
केचे कर्मचारी व सोसायटीचे सचिव हे या परिस्थितीतही चांगले काम करत आहेत. त्यांना सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
सध्या बँकेचे जवळपास १६० कर्मचारी हे पॉझिटिव्ह आहेत, तर ८ कर्मचाऱ्यांचे निधन झाले, तर ३० कंत्राटी कर्मचारीही पॉझिटिव्ह आहेत, अशी माहितीही शेळके यांनी दिली