अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- कोरोनाकाळात कार्यालयाच्या आवारातच कर्मचाऱ्यांसह वाढदिवसाची जंगी पार्टी केल्याने मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. तसेच कोरोना काळातील त्यांच्या कामाचा परफॉर्मन्स देखील विचारात घेण्यात आला होता.
त्यानंतर आयुक्त शंकर गोरे यांनी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश दिले होते. दरम्यान यांच्यावर करण्यात आलेली सक्तीच्या रजेची कारवाई महापालिका आयुक्तांनी मागे घेतली आहे. प्राथमिक चौकशी बाधा न येऊ देता, त्यांना वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदावर रुजू करुन घेण्यात आले आहे.
बुधवारी (दि.28) आयुक्त गोरे यांनी डॉ. बोरगे यांच्यावरील कारवाई रद्द करुन पुन्हा सेवेत हजर होण्याचे आदेश काढले. आरोग्य विभागातील कामकाजाबाबत झालेल्या तक्रारींनंतर डॉ. बोरगे यांना 9 जूनपासून सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. त्यांची प्राथमिक चौकशीही सुरू करण्यात आली होती.
सुमारे दीड महिन्यांनंतर त्यांची सक्तीची रजा रद्द करण्यात आली आहे. आयुक्त गोरे यांनी प्राथमिक चौकशीस बाधा न येता, त्यांना रुजू करुन घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार डॉ. बोरगे यांनी बुधवारीच सेवेत रुजू होऊन, वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.