अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :- संपूर्ण नगर शहराचा कचरा बुरूडगाव डेपोमध्ये आणला जातो. त्यामुळे दुर्गंधी पसरते. शहरातील संपूर्ण कचरा बुरूडगावमध्ये न टाकता पर्यायी व्यवस्था करावी, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा ग्रामपंचायत सदस्यांनी दिला होता. यामुळे आता मनपाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.(AMC News)
बुरूडगावच्या ग्रामसभेत महापालिकेला शहरातील कचरा बुरूडगाव डेपोत टाकू न देण्याचा, त्यासाठी दिलेली ‘ना हरकत’ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे शहरातून संकलित होणार्या कचर्यासाठी महापालिकेकडून बुरूडगाव डेपो ऐवजी पर्यायी जागेचा शोध सुरू झाला आहे.
याबाबत नगर शहराच्या महापौर रोहिणी शेंडगे, आयुक्त शंकर गोरे यांनी नुकतीच बुरूडगाव ग्रामपंचायत पदाधिकार्यांशी चर्चा केली. या चर्चेवेळी महापौर व आयुक्तांनी कचरा डेपोसाठी पर्यायी जागा शोधण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
तसेच आगामी महासभेत पर्यायी जागेचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. दरम्यान बुरूडगाव ग्रामपंचायत हद्दीतील भूखंडावरील कचरा डेपोमध्ये कचरा टाकू देण्याच्या बदल्यात महापालिकेकडून बुरूडगावला टँकरने पाणीपुरवठा केला
जाईल, नगर शहरातून बुरूडगावकडे जाणार्या रस्त्याची दुरूस्ती केली जाईल, त्यावर पथदिवे उभारले जातील, वृक्षारोपण करून सुशोभीकरण केले जाणार असल्याची माहिती महापौरांनी यावेळी दिली आहे.