Cotton Market Update: चालू हंगामामध्ये कापूस बाजारपेठ ही पूर्णपणे कोलमडलेली दिसून येत असून कापसाचा पुरवठा देखील अत्यल्प प्रमाणात होत असल्यामुळे कापूस उद्योग देखील अडचणीत सापडल्याचे सध्या चित्र आहे.
यामागील प्रमुख कारण म्हणजे जर आपण यावर्षीच्या तुलनेत मागच्या वर्षीच्या विचार केला तर मागच्या वर्षी कापसाला कधी नव्हे एवढे दर मिळाले होते. त्या दृष्टिकोनातून या वर्षी कापसाच्या लागवड क्षेत्रात वाढ होईल अशी एक शक्यता होती.
तशा आशयाची वाढ झाली सुद्धा परंतु महाराष्ट्रामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये आणि तसेच ऑक्टोबर या महिन्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालून कपाशी पिकाचे खूप मोठे नुकसान केले. या सगळ्या नैसर्गिक आपत्तीतून वाचलेल्या जे काही कपाशी पीक होते त्या माध्यमातून जो काही कापूस बाजारपेठेत आला त्याला सुरुवातीला चांगले दर मिळाले.
परंतु हळूहळू या दरांमध्ये घसरण होत गेली व चार दिवसांपूर्वी संपूर्ण कापूस मार्केटस क्रश झाल्याचे चित्र होते. सुरुवातीच्या आणि सध्याच्या भावांमधला फरक पाहिला तर तो तब्बल अडीच हजारांनी घसरण झाल्याचे यामध्ये दिसून आले. या सगळ्या परिस्थितीमुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडल्याचे सध्या चित्र आहे. परंतु जर आपण कालचा विचार केला तर यामध्ये बदल होताना दिसून येत असून येणाऱ्या काही दिवसात कापूस मार्केट तेजीत येईल अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कापुस बाजारात तेजीची शक्यता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार केला तर या ठिकाणी कापसाच्या खंडीच्या दरात अचानक वाढ झाल्यामुळे काही ठिकाणी प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यात कापसाच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले. चार दिवसांपूर्वीचा विचार केला तर कापसाला सात हजार तीनशे ते सात पाचशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर मिळत होता परंतु काल त्यामध्ये वाढ होऊन आठ हजार ते आठ हजार पाचशे रुपये पर्यंतचा दर मिळाला.
दुसरीकडे आपण विचार केला तर शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळावा यासाठी सीसीआय देखील खुल्या बाजारात कापूस खरेदीसाठी उतरली असून कापूस खरेदी केंद्र सुरू केली होती. परंतु संपूर्ण देशात कापसाचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांनी संपूर्ण राज्यात कापसाची विक्रीच बंद केली.
त्यामुळे सीसीआयचे नगर व नंदुरबार ठिकाणचे केंद्र देखील कापसाअभावी ओस पडलेले दिसून आलेत. दुसऱ्या बाजूने विचार केला तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणणे बंद केल्यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली.
कापसाच्या खाजगी व्यापाऱ्यांचा विचार केला तर ते आठ ते साडेआठ हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा दर देत आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या अपेक्षा दहा ते बारा हजार रुपये क्विंटल दराची असल्यामुळे शेतकरी बंधूंनी कापूस विक्रीला आणण्यात टाळल्याने कापसाचा पुरवठा नगण्य झाला.
कापसाचा हमीभाव 6,380 रुपये असून खाजगी व्यापारी मात्र आठ ते साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल दर देत आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या अपेक्षा जास्त असल्याने कापूस बाजारात विक्रीसाठी येत नसल्यामुळे कापूस बाजारामध्ये शुकशुकाट पसरल्याचे सद्यस्थिती आहे.
तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार केला तर या ठिकाणी खंडीचे दर 52 ते 57 हजार रुपये होते. यामुळे देखील कापसाच्या दरात घसरन झाली होती. परंतु सध्या कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढून खंडीचे दर 61 ते 62 हजारपर्यंत गेले.
या कारणामुळे खाजगी व्यापाऱ्यांनी प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी आठ ते साडेआठ हजार रुपयांचा दर कपाशीला दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात कापसाच्या दरात तेजी येईल अशी एक शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.