अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 Krushi news :- या वर्षी कापसाला कधी नव्हे तो ऐतिहासिक विक्रमी दर मिळत आहे. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील मुख्य पीक अर्थात कापूस आणि सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
यामुळे कापसाच्या उत्पादनात (Cotton Production) मोठी घट झाली होती. कापसाच्या उत्पादनात घट झाली असली तरी देखील सुरुवातीला कापसाला अपेक्षित असा बाजार भाव (Cotton Rate) मिळत नव्हता.
यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी (Cotton Growers) बाजारपेठेतील गणित समजून घेऊन कापसाची साठवणूक करण्यास सुरुवात केली. कापसाची साठवणूक केल्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी वाढल्यामुळे मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली.
मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने सुरुवातीचा काही काळ वगळता संपूर्ण हंगाम भर कापसाच्या दरात मोठी तेजी बघायला मिळत आहे. कापसाचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. साधारणता कुठल्याही हंगामाच्या अंतिम टप्प्यात बाजार भावात मोठी घट होत असते मात्र कापूस याला अपवाद ठरत असून हंगामाच्या अंतिम टप्प्यात देखील कापसाला विक्रमी बाजार भाव मिळत आहे.
राज्यात कापसाला अकरा हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा अधिक दर मिळत आहे त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी (Farmer) आनंदी असल्याचे चित्र राज्यात बघायला मिळत आहे. अकोला एपीएमसी मध्ये (Akola Apmc) देखील कापसाला चांगला दर मिळत आहे, सध्या या एपीएमसीमध्ये कापसाला बारा हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा विक्रमी भाव प्राप्त होतं आहे. ज्या शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली होती, त्यांना आता विक्रमी भाव मिळत आहे.
असे असले तरी, आता अनेक जिल्ह्यांतील बाजारपेठेत कापसाची आवक थांबली आहे, या ठिकाणी आता कापसाचा हंगाम संपुष्टात आला आहे. शेतकऱ्याकडे कापूस शिल्लक राहिलेला नाही.
तर दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला होता, तो आता विकून त्यांना चांगला नफा मिळत असला तरी शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच जास्त नफा मिळत आहे, असे कृषी तज्ञांकडून सांगितले जात आहे.
हंगामाच्या सुरुवातीलाच कापसाचे भाव वाढण्याची अपेक्षा कापुस उत्पादक शेतकऱ्यांना होती. मात्र असे घडले नाही हंगामाच्या सुरुवातीला 7,500 रुपये प्रति क्विंटल एवढा कापूस विकला गेला.
मात्र त्यानंतर कापसाच्या भावात मोठी सुधारणा झाली आणि आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात कापूस 11,700 रुपयांवर विक्री होतं आहे. सुरुवातीला मिळत असलेल्या कमी दरात शेतकऱ्यांनी कापूस विकला, त्यावेळी काही व्यापाऱ्यांनी कापसाची विक्री केली नाही तर साठवणूक करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले.
आता कापसाचे भाव दुपटीने वाढले आहेत. अशा स्थितीत साठवणूक केलेला कापूस विकणाऱ्या शेतकऱ्यांना जितका फायदा झाला नाही तितका व्यापाऱ्यांची चांदी होत आहे. खरिपातील कापूस उत्पादनात घट झाल्यानंतर भाव स्थिर झाले होते. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी साठा जमा केला होता, ज्याचा त्यांना आज लाभ मिळत आहे.
त्यामुळे ज्या शेतकऱ्यानी बाजाराचा अभ्यास करून योग्य वेळी विक्री करण्याचा निर्णय घेतला त्यांना आता फायदा होत आहे. मात्र अशा शेतकऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे या वाढीव दराचा फायदा फक्त आणि फक्त व्यापाऱ्यांनाच होत असल्याचे चित्र राज्यात बघायला मिळत आहे.