Credit card : अलीकडच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर वाढला आहे. नागरिक आता बँकेच्या रांगेत उभे न राहता क्रेडिट कार्डमधून झटपट पैसे काढत आहेत. प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देत असते. क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही वेगवेगळे व्यवहार करू शकता.
जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्यापूर्वी तुम्हाला सर्व माहिती असावी लागते. कारण तुमच्या एका चुकीमुळे तुम्ही कष्टाने कमावलेले पैसे वाया जाऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे अनेकांना याबद्दल माहिती नाही. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती.
तयार करा बजेट
जर या सणासुदीच्या काळात तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करणार असाल तर तेव्हा त्याचे बजेट ठरवून घ्या. कारण जर तुम्ही कोणत्याही बजेटशिवाय खरेदी केली तर तुमचे बजेट बिघडू शकते आणि याचा लोकांना फायदा होण्याऐवजी आर्थिक फटका बसू शकतो.
क्रेडिट कार्ड लिमिट
हे लक्षात ठेवा की सर्व क्रेडिट कार्ड्सची काही मर्यादा असते. या मर्यादेतच पेमेंट केले जाते. यावेळी तुम्ही खरेदी करता त्यावेळी क्रेडिट कार्डची मर्यादा लक्षात ठेवली जाते. तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डच्या मर्यादेपेक्षा जास्त खरेदी करू नये. जर तुम्ही क्रेडिट कार्ड मर्यादेपेक्षा जास्त खर्च केला तर तुम्हाला दंडालाही सामोरे जावे लागू शकते.
बक्षिसे आणि सवलत
तुम्हाला क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करण्यावर खूप बक्षिसे आणि सवलत दिली जाते. या फेस्टिव्हल सीझनमध्ये लोकांना विविध ऑफर्स आणि डिस्काउंटही दिले जात आहेत. अशा प्रकारे, ज्यावेळी तुम्ही खरेदी करता त्यावेळी बक्षिसे आणि सवलत लक्षात ठेवावी जेणेकरून तुम्हाला त्याचे फायदे मिळू शकतील.
क्रेडिट कार्ड वापर
अनेकांकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड देखील असू शकतात. अशा परिस्थितीत, कोणतीही खरेदी करत असताना असे क्रेडिट कार्ड वापरा ज्याद्वारे तुम्हाला जास्तीत जास्त लाभ मिळत आहेत.