ताज्या बातम्या

आताचे विरोधक हलकट, यशवंतराव गडाखांनी अशी केली तुलना

Maharashtra news:आपली पुढील भूमिका स्पष्ट करण्यासाठी माजी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी बोलाविलेल्या मेळाव्यात त्यांचे वडील आणि ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचेही भाषण झाले.

त्यांनी स्थानिक विरोधकांचा चांगलचा समाचार घेतला. त्या काळात आपल्यालाही विरोधकांनी त्रास दिला मात्र, आताचे विरोधक हलकपणा करीत आहेत, असा आरोप गडाख यांनी केला.
गडाख म्हणाले, कौटुंबिक दु:खात असतानाही नेवासा तालुक्यातील विरोधकांनी आम्हाला त्रास दिला.

ज्यांना बोटाला धरून राजकारण शिकविले, तीच माणसे आमच्या विरोधात गेली. राजकीय विरोध तर केलाच मात्र, कौटुंबिक विषयांत हात घालून विनाकापण कोर्टबाजी केली. पूर्वीही विरोधक होते.

त्यांनी मलाही विरोध केला. मात्र, आज शंकरराव गडाख यांना जेवढ्या खालच्या पातळीवर जाऊन त्रास दिला जात आहे, तसा प्रकार माझ्या बाबतीत नव्हता.आता राजकारण बदलत आहे. ते आणखी बदलणार आहे.

त्यामुळे आपण आपले स्थिर राहिलेले चांगले. संघटना वाढली पाहिजे. त्या ताकदीवर आपण काहीही करू शकतो. तालुक्यातील काही कार्यकर्ते मला विचार होते की आता आपण जय श्रीराम करायचे का? पण मी सांगतो, त्यची गरज नाही. आपली हीच एकजूट कायम ठेवा. शंकररावांच्या पाठीशी उभे रहा. आपली बॅटच बरी आहे, असेही गडाख म्हणाले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts