ताज्या बातम्या

Recharge Plan : ग्राहकांना बसला मोठा धक्का! ‘या’ कंपनीने बंद केला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन

Recharge Plan : BSNL च्या वापरकर्त्यांसाठी धक्का देणारी एक बातमी आहे. कारण BSNL ने आपला आणखी एक सर्वात स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन कायमचा बंद केला आहे.

त्यामुळे वापरकर्त्यांना आता इथून पुढे कमी किमतीत उपलब्ध असलेल्या फायद्यांचा लाभ घेता येणार नाही. त्यांना आता रिचार्जसाठी जास्त पैसे मोजावे लागतील.

BSNL ने गत वर्षी म्हणजे जुलैमध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगणा, उत्तराखंड आणि लक्षद्वीप UT मध्ये देशातील सहा मंडळांमध्ये आपल्या ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त 329 रुपयांचा प्लॅन लॉन्च केला होता. परंतु, आता या योजनेचा लाभ देशातील कोणत्याही वर्तुळात मिळत नसल्याने तो पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

मिळत होते हे फायदे

या प्लॅनमध्ये 20Mbps स्पीडसह 1TB हायस्पीड डेटा मिळत होता. डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 2Mbps पर्यंत कमी केला होता. इतर ब्रॉडबँड पुरवठादारांच्या तुलनेत हा सर्वात स्वस्त प्लॅन होता पण आता तो उपलब्ध नाही.

आता मोजावे लागणार जास्त पैसे

वापरकर्त्यांना आता जर हाय-स्पीड ब्रॉडबँड प्लॅन पाहिजे असेल तर किमान 399 रुपयांच्या प्लॅनसह रिचार्ज करावा लागणार आहे. हा प्लॅन 30Mbps च्या इंटरनेट स्पीडसह 1TB डेटाचा लाभ देतो.

तसेच डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 4Mbps पर्यंत कमी करण्यात येणार असून प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचाही फायदा मिळणार आहे. याशिवाय 449 रुपयांचा प्लॅन देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये 30Mbps स्पीडसह 3.3TB डेटा उपलब्ध आहे.

BSNL ने आणली खास ऑफर

BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली असून या ऑफरमध्ये 31 मार्च 2023 पर्यंत ग्राहकांना BSNL भारत फायबर कनेक्शन मोफत मिळणार आहे. तसेच कंपनी मोफत इन्स्टॉलेशन व्यतिरिक्त मोफत वायफाय राउटरही इन्स्टॉल करणार आहे. या ऑफरसाठी वापरकर्त्यांना सहा महिन्यांसाठी फायबर बेसिक प्लस, फायबर व्हॅल्यू, सुपर स्टार प्रीमियम प्लस किंवा फायबर प्रीमियम प्लस ओटीटी रिचार्ज करावा लागणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts