Attention SBI customers : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण या बँकेच्या काही ग्राहकांच्या खात्यातून 147 रुपये कापले जात आहेत.
जर तुमच्याही खात्यातून पैसे कापले जात असतील किंवा कापले गेले असतील तर वेळीच सावध व्हा.नाहीतर तुम्हालाही आर्थिक फटका बसू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता यामागचे कारण समोर आले आहे.
प्रत्येक वर्षी देखभाल शुल्क म्हणून SBI 125 रुपये आणि ग्राहकांद्वारे वापरलेल्या एकाधिक डेबिट कार्डांसाठी अतिरिक्त 18 टक्के GST आकारत असते. हा खर्च एकत्रित केला तर तो 147.50 रुपयांवर येतो. तसेच ही बँक डेबिट कार्ड बदलण्यासाठी किंवा बदलण्यासाठी ₹300 + GST आकारत असते.
बँकेने केले व्यवहार शुल्क सुधारित
SBI कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेडने क्रेडिट कार्डशी निगडित वेगवेगळ्या व्यवहारांसाठी त्यांचे व्यवहार शुल्क सुधारित केले असून आता SBI कार्डने आपल्या वेबसाइटवर नमूद केले आहे की ‘W.e.f. 15 नोव्हेंबर 2022, सर्व भाडे देयक व्यवहारांवर 99 रुपये + लागू कर प्रक्रिया शुल्क आकारण्यात येणार आहे.
SBI ही बँक मालमत्ता, ठेवी, शाखा, ग्राहक आणि कर्मचारी यांच्या बाबतीत सर्वात मोठी व्यावसायिक बँक आहे. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत, बँकेकडे 44.63% च्या CASA गुणोत्तरासह 41.90 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी आहेत तर 30 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त अग्रिम आहे.
या बँकेचा बाजार हिस्सा 32.9% इतका आहे. तर SBI कडे 22,309 शाखा आणि 65,796 ATM/ADWM चे सगळ्यात मोठे नेटवर्क आहे. 66,757 BC आउटलेट आहेत.