ताज्या बातम्या

DA Hike : होळीपूर्वी सरकार करणार मोठी घोषणा ! 48 लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा, DA सोबत वाढवणार हा भत्ता

DA Hike : केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळीपूर्वी मोठी भेटवस्तू देण्याची तयार केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचारी मालामाल होणार असल्याचे दिसत आहे. कर्मचाऱ्यांच्या DA सोबत आणखी एक भत्ता वाढवला जाणार आहे.

केंद्र सरकारकडून लोकसभा निवडणूक लक्षात घेता कर्मचाऱ्यांच्या DA वाढीची घोषणा लवकरच केली जाऊ शकते. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात अद्याप वाढ करण्यात आलेली नाही. लवकरच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाईल.

केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या DA सोबत DR देखील वाढवला जाणार आहे. याचा फायदा लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे. 2024 मध्ये कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4 टक्कयांनी वाढवला जाऊ शकतो. तसेच कर्मचाऱ्यांचा DR देखील वाढवला जाईल.

वर्षातून दोन वेळा कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ केली जाते. जानेवारी ते जून या दरम्यान पहिली DA वाढ करण्यात येत असते तर जुलै ते डिसेंबर यादरम्यान कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दुसरी DA वाढ करण्यात येत असते.

मार्च 2024 मध्ये होळी आहे. या दरम्यान केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना मोठी भेटवस्तू देऊ शकते. DA वाढ केल्यानंतर कर्मचाऱ्यांची यंदाची होळी गोड साजरी होणार आहे. होळीपूर्वी सरकार DA वाढीची घोषणा करू शकते.

DA वाढीची गणना कशी केली जाते?

कामगार ब्युरोद्वारे दर महिन्याला आकडेवारी जाहीर केली जाते. त्यानंतर सरकारकडून कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या DA वाढीचा निर्णय घेतला जात असतो. सध्या कर्मचाऱ्यांचा DA 46 टक्के आहे तर 4 वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांचा DA 50 टक्के होईल.

केंद्र सरकारकडून DA वाढ केली तर त्याचा फायदा 48.67 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 67.95 लाख निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे. केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या DA वाढीबाबत सकारात्मक पाऊले उचलली जात असल्याची माहिती मिळत आहे.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts