DA Hike Breaking : केंद्र सरकारकडून लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले जाऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांची यंदाची होळी गोड होणार आहे. DA सोबत कर्मचाऱ्यांच्या DR मध्ये देखील वाढ होणार आहे.
केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांपर्यंत वाढ केली जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार असून पगारात देखील वाढ होणार आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच पेन्शनधारकांना देखील फायदा होणार आहे.
केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोन वेळा वाढ करण्यात येत असते. 2024 या वर्षात अद्याप कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आलेली नाही. आता लवकरच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाणार आहे.
देशातील 48.67 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आणि 67.95 लाख पेन्शनधारकांना DA वाढीचा फायदा होणार आहे. मागील वर्षी ऑक्टोबर 2023 मध्ये सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवला होता.
2024 मध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात देखील 4 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. CPI-IW आकडेवारी जाहीर केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांचा DA 50 टक्के होईल.
मार्च 2024 मध्ये केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना होळी भेट दिली जाऊ शकते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. DA सोबत DR देखील वाढवला जाण्याची शक्यता आहे.
कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार
केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केल्यानंतर पगारातही वाढ होणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 18,000 रुपये आहे त्यांना 46 टक्के दराने 8,280 रुपये भत्ता मिळत आहे. जर 4 टक्के वाढ झाल्यानंतर हाच DA 9,000 रुपये होईल.