DA Hike : केंद्र सरकारकडून लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांना मोठा लाभ दिला जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. केंद्र सरकारकडून लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी कंबर कसण्यात आल्याचे दिसत आहे.
केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ केली जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि महागाई भत्त्यात मोठी वाढ होणार असल्याची माहिती आहे. मार्च 2024 मध्ये केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करू शकते.
सरकारकडून मार्च 2024 मध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के DA वाढ केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे. DA वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील वाढ होणार आहे.
सध्या कर्मचाऱ्यांना 46 टक्के DA दिला जात आहे. कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 4 टक्के वाढ केली तर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्के होईल. ACPI-IW च्या आकडेवारीनंतर सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या DA वाढीवर निर्णय घेतला जाणार आहे.
केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ करण्यात आल्यानंतर 47.58 लाख कर्मचाऱ्यांना आणि 69.76 लाख पेन्शनधारकांना त्याचा लाभ होणार आहे. वर्षातून दोन वेळा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाते.
जानेवारी ते जून या महिन्यात पहिली DA वाढ केली जाते तर जुलै ते डिसेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दुसरी DA वाढ केली जाते.
कर्मचाऱ्यांना या वर्षातील पहिली DA वाढ अद्यापही करण्यात आलेली नाही. मार्च महिन्यात पहिली DA वाढ करण्यात येणार असली तरी जानेवारी 2024 पासून त्यांना याचा लाभ दिला जाणार आहे.
कर्मचाऱ्यांचा HRA कसा वाढेल?
केंद्र सरकारकडून DA वाढीबरोबरच HRA वाढ देखील दिली जाऊ शकते. केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये 3 टक्के वाढ केली जाऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा HRA 27 टक्क्यांवरून 30 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.