DA Hike Latest Update : केंद्र सरकारचे(Central Govt) कर्मचारी महागाई भत्त्याच्या (DA) वाढीच्या प्रतीक्षेत आहेत अशातच याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काही कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सॲपवर डीए वाढला (DA increase) असल्याचा मेसेज येत आहे.
PIB ने व्हायरल होत असलेल्या मेसेजमागचे (WhatsApp Fake Message) सत्य तपासले आहे. तपासात त्यांना हा मेसेज चुकीचा असल्याचे आढळून आले आहे.
व्हायरल मेसेजमध्ये (Viral message) करण्यात आलेल्या दाव्यानुसार- राष्ट्रपतींना हा निर्णय घेताना खूप आनंद होत आहे की 1 जुलै 2022 पासून केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना देय असलेला महागाई भत्ता (Dearness Allowance) मूळ वेतनाच्या सध्याच्या 34% वरून 38% पर्यंत वाढवण्यात येणार आहे.
पीआयबी फॅक्ट चेकने ट्विटरवर सांगितले – व्हॉट्सॲपवर प्रसारित केलेल्या ऑर्डरमध्ये, असा दावा करण्यात आला आहे की महागाई भत्त्याचा अतिरिक्त हप्ता 01.07.2022 पासून प्रभावी होईल. हा आदेश बनावट आहे. खर्च विभाग, @FinMinIndia ने असा कोणताही आदेश जारी केलेला नाही.