निवडणुकीत पराभव झाल्यानंतर दत्ता पानसरे यांनी केली भविष्यवाणी ! म्हणाले आता भावी आमदार

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील बिगरशेती मतदारसंघाची निवडणूक खूपच चुरशीने लढली गेली.

सुमारे साडे तेराशे मतदार या मतदारसंघात होते.त्यांना आपल्याकडे ओढण्याची चढाओढ होती. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

रविवारी सकाळी मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या फेरीतच गायकवाड यांनी आघाडी घेतल्यानंतर त्यांचा विजय निश्चित झाला होता.त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी जिल्हा बँकेच्या परिसरात फटाके उडवत व गुलाल उधळत जल्लोष सुरू केला होता.

निवडणूक अंतिम मतमोजणीनंतर गायकवाड 189 मतांची आघाडी घेऊन विजय झाल्याचे स्पष्ट झाल्यावर स्वतः गायकवाड मतमोजणी स्थळी आले.

त्यावेळी खाली आवारातील त्यांच्या समर्थकांनी त्यांना खांद्यावर घेत जल्लोष केला. तो संपल्यावर ते जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील मतमोजणी स्थळी आले.

या मतदारसंघातील पराभूत उमेदवार पानसरे हे तेथेच समर्थकासमवेत बसले होते.गायकवाड यांनी त्यांना पाहून लगेच त्यांची भेट घेतली. आधी त्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले.

त्यावेळी पानसरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी पानसरे यांच्याशी बोलताना गायकवाड म्हणाले, इलेक्शन काळात काही चुका झाल्या असतील,मी काही बोललो असेल तर लहान भाऊ समजून मला माफ करा.

त्यांचे हे वाक्य ऐकताच पानसरे यांनी त्यांच्या पाठीवर थाप टाकली. ते म्हणाले, प्रशांत, तुझे अभिनंदन व तू आता भावी आमदार आहेस. या घटनेची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा होती.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts