मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात एक पेन ड्राईव्ह (Pen drive) सादर करून राज्य सरकारने (State Government) चक्क दाऊदची माणसं वक्फ बोर्डावर नियुक्त केली, असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.
फडणवीसांनी या पेन ड्राईव्ह मधून वक्फ बोर्डावर डॉ. मुदस्सीर लांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे. शिवाय या मुदस्सीर यांचे दाऊदशी संबंध आहेत, असा संताप विधानसभेत व्यक्त केला आहे.
यावर बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip walse patil) यांनी फडणवीसांनी केलेल्या या आरोपावर उत्तर दिले आहे. ते यावेळी सभागृहात म्हणाले, मुदस्सीर लांबे यांच्याबाबतची तुमच्याकडे असलेली माहिती चुकीची आहे.
या व्यक्तिची नेमणूक सरकारने केली नाही. या बाबतची निवडणूक ३० ऑगस्ट २०१९ रोजी पार पडली होती. ते निवडून आलेले सदस्य आहेत. विनाकारण दाऊद दाऊद (dawood) करू नका.
त्यांचा जर दाऊदशी संबंध असेल तर त्यांच्यावर काय कारवाई करायची, त्यांना काढून टाकायचं का याची कारवाई करू, अशी ग्वाही देत फडणवीस यांनी केलेल्या आरोपातील दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात हवा काढली आहे.
दरम्यान, फडणवीस यांनी सादर केलेल्या पेन ड्राईव्हमध्ये मोहम्मद अर्शद खान (Mohammad Arshad Khan) आणि डॉ. मुदीस्सर लांबे.
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab malik) यांनी वक्फ बोर्डावर सदस्य म्हणून नेमलं ते मुदस्सीर लांबे (Mudassir Lambe) हेच आहेत.
३१ डिसेंबर २०२० ला त्यांच्या विरोधात एका ३३ वर्षीय सामाजिक कार्यकर्तीने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला तेव्हा लांबेने लग्न करण्याची तयारी दाखवली आणि गंभीर परिणाम भोगण्याची धमकी या महिलेला दिली, असे विधानसभेत बोलले आहेत.