ताज्या बातम्या

Dearness Allowance Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! महिन्याला इतकी रक्कम येणार खात्यात

Dearness Allowance Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Employees) दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ऑगस्ट महिन्यात महागाई भत्त्यात (DA) वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

DA किती वाढू शकतो

3 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या (Cabinet) बैठकीत डीएमध्ये 5 ते 6 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय (Decision) सरकार (Government) घेईल, अशी अपेक्षा आहे. यामुळे देशभरातील कोट्यवधी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना (Pension) डीएचा लाभ मिळू शकतो.

याआधी सरकार महागाई भत्त्यात 5 टक्क्यांनी वाढ करेल अशी अपेक्षा होती. पण अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ही वाढ 5 टक्क्यांऐवजी 6 टक्क्यांपर्यंत असू शकते.

ते कधी जाहीर केले जाऊ शकते ते जाणून घ्या

या वाढीला सरकारने मंजुरी दिल्यास केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे. कोरोनामुळे सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा डीए तब्बल 18 महिन्यांपासून रोखून धरला आहे. अशा परिस्थितीत 3 ऑगस्टला महागाई भत्ता वाढीची घोषणा झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होऊ शकते.

आता तुम्हाला किती DA मिळतो

सध्या केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारकडून 34 टक्के महागाई भत्त्याचा लाभ दिला जातो. 2021 पासून सरकारने डीएमध्ये 11 टक्के वाढ केली आहे. यावर्षी मार्च 2022 मध्ये सरकारने डीए 31 टक्क्यांवरून 34 टक्के करण्याचा निर्णय घेतला होता.

आता पुन्हा एकदा महागाई भत्ता 5 टक्क्यांनी वाढवला तर तो 39 टक्के होईल. याचा थेट परिणाम 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांवर होणार आहे. साधारणत: 1 जानेवारी आणि 1 जुलैपासून महागाई भत्ता वाढवण्याचा ट्रेंड आहे, अशा परिस्थितीत जुलै महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची भेट मिळू शकते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts