अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- गर्दीचे नियमन करत भाजीपाला फळे विक्री कशी करता येईल. मार्केटयार्डसह शहर हद्दीतील भाजीपाला विक्री बंदी आदेश रद्द करत भाजीपाला विक्रेते, फळे विक्रेते, शेतमाल विक्रेते शेतकरी यांना पासेस देऊन विक्री करण्याची परवानगी द्यावी.
अशी मागणी झिंजे, वाकळे, शेख यांनी केली. त्यानुसार मनपा हद्दीतील भाजीपाला व फळे विक्रेते संघटनांकडून प्रस्ताव घेऊन त्यांना परवानगी देण्याबाबत स्वतंत्र बैठक आयोजित करून परवानगी दिली जाईल.
दि.२६ रोजी पालकमंर्त्यांच्या निदर्शनास ही सर्व माहिती आणुन दिली जाईल त्यानंतर दि.२८ च्या बैठकीत सदर विषयी प्रस्ताव सादर करून निर्णय घेतला जाईल.
असे आयुक्तांनी सांगितले.मनपा हद्दीतील भाजीपाला विक्री बंदी रद्द करून लहान मुले, गरोदर महिला व आजारी नागरिक यांना सकस आहार मिळावा.
शेतकऱ्यांना आपला शेतमाल भाजीपाला विक्री सुरू करून दिलासा देण्यासाठी, अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने भैरवनाथ वाकळे यांनी आयुक्त शंकर गोरे यांच्या निवासस्थानासमोर लाक्षणिक उपोषणाची नोटीस दिली होती.
त्यानुसार उपायुक्त डॉ.पठारे यांनी झिंजे व वाकळे यांच्यासोबत चर्चा करून आयुक्त व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित केली होती. त्यानुसार मनपा आयुक्त कार्यालयात शंकर गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.’