कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचार्‍यांना करोना योद्धा घोषित करा

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचार्‍यांना करोना योद्धा घोषित करून त्यांचे लसीकरण तातडीने करावे, अशी मागणी भाजपाचे प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

कोरोनाची दुसरी जीवघेणी लाट आलेली असताना देखील राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीतील बांधवांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शंभर टक्के उपस्थिती देत शेतकरी वर्गाकडील माल खरेदी करून जीवनावश्यक मालाचा पुरवठा केला आहे. यामुळे हे कर्मचारी देखील करोना योद्धाच आहे.

यावेळी बोलताना भाजपच्या कोल्हे म्हणाल्या, करोना काळात कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रत्येक कर्मचारी व हमाल आदी बांधवांनी जीव धोक्यात घालून सर्व नियमांचे पालन करत शेतमाल खरेदीत मोलाची भूमिका बजावली.

बळीराजाला आर्थिक नुकसानाला सामोरे जाऊ लागू नये यासाठी हे कर्मचारी अहोरात्र झटले. शेतकरी वर्गास आवाहन करून त्यांच्याकडील शेतमाल बाजार समितीत आणून त्याचे नियोजन चांगल्याप्रकारे हाताळले आहे.

त्यामुळे त्यांची सेवा कौतुकास पात्र असून त्यांना करोना योद्धा जाहीर करून त्यांचे लसीकरण तातडीने पूर्ण करण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts