अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 Krushi news :- ज्वारीच्या दर वर्षी वाढत्या उत्पादनामुळे ज्वारीला दरवर्षी भाव कमी मिळतो.त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी पीक पद्धतीत बदल केले.परिणामी ज्वारीचे उत्पादन घटले आहे.शेतकऱ्यांना ज्वारीची चिंता नाही.
पण जनावरांसाठी आवश्यक असलेल्या कडब्याचे करायचे काय ही काळजी शेतकर्याला लाpगली आहे. यंदा पीक पध्दतींमध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या बदलाचे परिणाम ज्वारीच्या दरा बरोबरच जनावरांसाठी आवश्यक असलेल्या कडबा दरावर देखील पाहवयास मिळणार आहे.
कारण सध्या ज्वारीपेक्षा अधिकचा दर हा कडब्याला आहे. सध्या ज्वारी ही 2 हजार क्विंटल तर कडब्याला 2 हजार 500 रुपये शेकडा असा दर आहे.तर कडब्याची एक पेंढी 20 ते 25 रुपयांना विकली जात आहे.
तर दुसरीकडे ज्वारीला 20 रुपये किलो भावाने विकली जात आहे. उन्हाळी हंगामात ज्वारीची काढणी झाली की पावसाळ्यापर्यंत कडबा हाच जनावरांसाठी चारा असतो.
हीच परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरु होती. पण आता ज्वारीचे क्षेत्र घटल्याने कडब्याला अधिकचे महत्व आले आहे. आता जनावरांच्या चाऱ्याचे करायचे काय? जनावरांच्या चार्यात कमतरता आली की त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होणार आहे.
त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. ज्वारी च्या क्षेत्रामध्ये झालेली कमी पाहता मराठवाड्यातील शेतकरी ज्वारीची काढणी करून आता कडब्याची जुळवाजुळव करीत आहे. वाढत्या उन्हामध्ये शेतकरी आता ज्वारीपेक्षा चारा पिकांवर भर देताना दिसत आहे.