नगर-मुंबई-परळी रेल्वे सेवेचा नगर-आष्टी मार्ग कार्यान्वीत करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-अनेक वर्षापासून नगर-मुंबई-परळी रेल्वेचा प्रश्‍न प्रलंबीत आहे. या रेल्वेसाठी साकारण्यात आलेल्या नगर-आष्टी दरम्यानचा रेल्वेमार्ग कार्यान्वीत करण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन,

भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे. रेल्वे क्रांती आंदोलनाचा भाग म्हणून ही मागणी करण्यात आली असून,

या मागणीचे निवेदन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

बीड जिल्ह्यातील दुष्काळी पट्टा आणि नगर शहर मुंबईशी जोडला जावून सदर भागाचा सर्वांगीन विकास होण्यासाठी व नागरिकांच्या सोयीसाठी नगर-मुंबई-परळी रेल्वेसेवा सरकारने मंजूर केली.

दरवर्षी तोकडी रक्कम मिळत असल्याने या रेल्वेचे काम अर्धवट राहिलेले आहे. नगर ते नारायणडोह पर्यंत रेल्वेमार्ग चांगल्या स्थितीत झाला असून, त्याची चाचणी देखील घेण्यात आली आहे.

आष्टी पर्यंतचा मार्ग पुर्ण करुन नगर-मुंबई-परळी रेल्वे सेवा सुरु होई पर्यंत तात्पुरत्या स्वरुपात नगर-आष्टी ही रेल्वे सेवा सकाळ-संध्याकाळ या दोन वेळेत सुरु करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका व्यापारी दृष्ट्या नगर शहराशी जोडला गेलेला आहे. नगर-आष्टी ही रेल्वे सेवा सुरु झाल्यास तेथील युवक नगर शहराशी जोडले जाऊन त्यांचे देखील प्रश्‍न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

तर प्रलंबीत असलेल्या नगर-मुंबई-परळी रेल्वे सेवेला गती देखील मिळणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. ही रेल्वे सेवा सुरु होण्यासाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे,

अर्शद शेख, सुहास मुळे, जालिंदर बोरुडे, संजय सपकाळ, सुखदेव चौरे, किशोर झरेकर, बळीराव पाटोळे, आर.आर. पिल्ले, अशोक भोसले, शाहीर कान्हू सुंबे, शहादेव चव्हाण, पोपट भोसले आदी प्रयत्नशील आहेत.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts