ताज्या बातम्या

देशमुख-मलिकांच्या याचिका फेटाळली, मतदान करता येणार नाही

Maharashtra news : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्यास न्यायालयाने परवानगी नाकारली आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करू देण्याची अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मतदानासाठी काही तास विधानभवनात जाऊ देण्याची परवानगी त्यांनी मागितली होती. काल यावर सुनावणी पूर्ण झाली.

त्यावर न्यायालयाने आज निकाल देत कैद्यांना मतदानाला परवानगी देता येणार नाही, असे म्हणत याचिका फेटाळली आहे.सोमवारी, २० जून रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी देशमुख-मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी निवडणूक होणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts