ताज्या बातम्या

कृषीपंपाचे वीज खंडित करण्याचे सत्र अजूनही चालूच आदेश होऊनही शेतातील पिके टांगणीला!

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 Maharashtra News :- वीज तोडणी मुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांचे पाण्याविना नुकसान होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केल्याने अधिवेशनात

पुढील तीन महिने कृषी पंपाच्या विद्युत पुरवठा खंडित करू नये व ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

पण एकीकडे नांदेड जिल्ह्यात वीजोजडणी केली जात आहे. तर दुसरीकडे उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये आदेश मिळाले नसल्याचे सांगत ही कारवाई ही सुरु आहे.

तर तीन महिन्यासाठी वीज तोडणीची मोहिम स्थगित करण्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आदेश देऊन ही कारवाई सुरूच आहे.

ऐन रब्बी हंगामात कृषीपंपाच्या वाढत्या थकबाकीमुळे
महावितरण आणि विद्युत पुरवठा खंडित केल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. तर जालना, उस्मानाबाद जिल्ह्यातील 134 कृषी पंपांचे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान हे सुरूच आहे.

मात्र लेखी आदेश मिळाले नसल्याचेही अधिकारी सांगत वीजपुरवठा खंडित करण्याची मनमानी सध्या सुरू आहे. त्यामुळे आता शेतकरी अडचणीत आला असून याआधी अवकाळी पाऊस आणि आता पाण्याअभावी पिके जळून चाललेली दिसत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts