अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील गोडेगाव येथे ग्रामपंचायतने गावातील आरोग्य व स्वच्छाता राखण्यासाठी धडक कारवाईला सुरुवात केली.
त्यामुळे गावातील उघड्यावर शौच करणाऱ्यांची धांदल उडाली. मंगळवारी पहाटे सरपंच ग्रामविकास अधिकारी काही ग्रामपंचायत सदस्य यांनी पहाटे पहारा देऊन उघड्यावर शौचास बसणाऱ्यांचे फोटो काढून सोशल मीडियावर प्रसारित केले. त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले.
सरपंच व ग्रामविकास अधिकारी याच्या वर काय कारवाई करणार येणाऱ्या काळात समजेल. मात्र, या सोशल मीडियावर आलेल्या फोटोची दिवसभर गावात चर्चा सुरू होती. तालुक्यातील गोंडेगावात मोठ्या प्रमाणात नागरिक सार्वजनिक ठिकाणी शौचास जात असल्यामुळे गावातील आरोग्य धोक्यात आले.
आता कोरोना सारखा महाभयानक रोग कमी होत असताना गावातील आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठी गावात हागणदारीमुक्त व्हावे. गावातील बाहेर शौचास जाणाऱ्यांपैकी बऱ्याच नागरिकांच्या घरी वैयक्तिक शौचालय बांधलेले असून त्याचा वापर न करता ते सार्वजनिक ठिकाणी शौचास जात आहे.
त्यामुळे सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांनी कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे बाहेर शौचास जाणाऱ्यांची मोठी पंचाईत झाली. पुढील काळात याला पायबंद बसू शकतो. या कारवाईसाठी सरपंच सागर बढे, ग्रामविकास अधिकारी टी. के. जाधव, सदस्य अप्पामामा थोरात, ग्रामपंचायत कर्मचारी दतात्रय सोनवणे आदींनी पहाटे ही कारवाई केली.