सैनिक बँकेच्या नोकरभरतीवर संचालकाचा आक्षेप

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेत चेअरमन, व्हाईस चेअरमन, मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी काही संचालकांना हाताशी धरत स्वत:च्या नातेवाईकांना नियमबाह्य पध्दतीने बँक सेवेत घेतले आहे.

तर त्यांना कायम करण्याचा संचालक मंडळाने घाट घातला असल्याचा आरोप करुन, सदर नोकर भरतीची कलम 83 अनव्ये चौकशी करून कायम करण्याच्या

प्रयत्नांना प्रतिबंध करावा व ही नोकर भरती रद्द करण्याची मागणी संचालक सुदाम कोथिंबीरे, सभासद विनायक गोस्वामी, अन्याय निवारण सेवा समितीचे जिल्हा अध्यक्ष अरुण रोडे यांनी सहकार आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बँकेच्या सत्ताधारी संचालक मंडळाने सप्टेंबर 2020 नोकरभरतीमध्ये बँकेचे विद्यमान चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालकांच्या नातेवाईकांच्या मुलांची नियमबाह्य निवड केली आहे. चेअरमन शिवाजी व्यवहारे यांनी स्वताच्या मुलाची बेकायदा भरती केली आहे.

त्यासंदर्भात उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दावा चालू असतानाच इतर विद्यमान व्हाईस चेअरमन शिवाजी सुकाळे यांनी वडनेर गावचा सरपंच पदाचा कारभार हाकणार्‍या स्वताच्या मुलाला बँक सेवेत घेतले आहे.

तर मुख्यकार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांनी व काही कर्मचारी, संचालकांनी आर्थिक हित संबध साधत स्वताचे 15 नातेवाईक बँक सेवेत घेतल्याचा आरोप अरुण रोडे यांनी तक्रार करताना म्हंटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts