ताज्या बातम्या

अपघातात बाळाला अपंगत्व; न्यायालयाने केली येवढ्या लाखांची भरपाई मंजूर

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- टँकरने जीपला दिलेल्या धडकेत एक महिन्याच्या बाळाला गंभीर दुखापत झाल्याने 79 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान भरपाई जिल्हा सत्र न्यायाधीश तथा मोटार अपघात प्राधिकरणाचे सदस्य एम. आर. नातू यांनी मंजूर केली आहे.

2 सप्टेंबर 2012 रोजी विजय गलगट्टे (रा. बोधेगाव ता. शेवगाव) यांचे कुटुंबीय जीपमधून अहमदनगर- जामखेड रस्त्याने देवदर्शनासाठी जात होते. शेरी गावाच्या शिवारात टँकरने जीपला चुकीच्या दिशेने धडक दिली.

विजय गलगट्टे यांचा एक महिने वयाचा मुलगा तन्मय या अपघातामध्ये गंभीर जखमी झाला. मेंदू आणि मणक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तन्मयला अपंगत्व आले आहे.

तन्मयचे पालक गणपत रामचंद्र देशपांडे यांनी या अपघातामुळे आलेल्या अपंगत्वाबद्दल नुकसान भरपाई मिळण्यासाठी अहमनगर येथील मोटार अपघात प्राधिकरणाकडे दावा दाखल केला होता.

या अपघाताला टँकर जबाबदार असल्याने मालक शिवम कन्स्ट्रक्शनचे प्रो.प्रा. श्रीराम प्रभुराव मुंडे (रा. कन्हेरवाडी ता. परळी वैजनाथ जि. बीड),

न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, ज्ञानेश्‍वर नुराजी मुंडे यांच्याविरुद्ध भरपाईचा दावा दाखल केला होता. औषधोपचार खर्च, अपंगत्व याबद्दल 79 लाख 50 हजार रुपयांची भरपाई मंजूर केली आहे.

तन्मयच्या वतीने अ‍ॅड. नंदकुमार देशमुख, अ‍ॅड. मंदार पळसकर यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. सिद्धांत शिंदे, अ‍ॅड. बी. एस. सरोदे, अ‍ॅड. विवेक सांगळे यांनी सहकार्य केले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts