ताज्या बातम्या

Discount on Bike and Scooters : अरे व्वा…! सणासुदीच्या काळात ‘या’ कंपनीने आणल्या धमाकेदार ऑफर्स, बाइक आणि स्कूटरवर झिरो डाऊनपेमेंटसह 5 हजारांपर्यंत कॅशबॅक

Discount on Bike and Scooters : जर तुम्ही बाइक (Bike) आणि स्कूटर (Scooter) खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण सणासुदीच्या काळात होंडा कंपनीने (Honda Company) धमाकेदार ऑफर्स आणल्या आहे.

या कंपनीच्या (Honda) बाइक आणि स्कूटरवर झिरो डाऊनपेमेंटसह 5 हजारांपर्यंत कॅशबॅक मिळत आहे. त्यामुळे तुमच्यासाठी ही खरेदीची उत्तम संधी आहे.

Honda च्या फेस्टिव्ह ऑफरमध्ये, तुम्ही स्कूटर किंवा बाईक खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक मिळवू शकता. हा कॅशबॅक कमाल 5000 रुपयांपर्यंत असू शकतो. याशिवाय, जर तुम्ही फायनान्स मिळवून दुचाकी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी कंपनी काही अटींसह झिरो डाउन पेमेंट देखील देत आहे.

ग्राहक नो कॉस्ट ईएमआयचाही लाभ घेऊ शकतात. याचा अर्थ तुम्हाला EMI वर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही. या सर्व ऑफर्ससाठी कंपनीच्या काही अटी देखील आहेत ज्यांचे पालन करावे लागेल.

या सर्व ऑफर्ससाठी कंपनीच्या काही अटी देखील आहेत ज्यांचे पालन करावे लागेल. कंपनीने कॅशबॅकसाठी स्टँडर्ड चार्टर्ड, फेडरल बँक, बँक ऑफ बडोदा, IDFC फर्स्ट बँक, वन कार्ड यांसारख्या कंपन्यांशी भागीदारी केली आहे.

कंपनीचे म्हणणे आहे की या वित्त योजना निवडक डीलरशिपवर उपलब्ध असतील, ज्या 31 ऑक्टोबरपर्यंत वैध असतील आणि कंपनी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय ही ऑफर मागेही घेऊ शकते.

Hero MotoCorp सप्टेंबर 2022 च्या विक्रीत होंडा दुचाकींच्या मागे आहे. दोन्ही कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, Hero MotoCorp ने सप्टेंबर 2022 मध्ये भारतात 2,22,712 वाहनांची विक्री केली, तर Honda याच कालावधीत 2,55,909 युनिट्सच्या विक्रीत पुढे होती.

 

ऑगस्ट 2022 मध्ये कंपनीने देशांतर्गत बाजारात 4,62,523 दुचाकींपैकी 4,23,216 युनिट्सची विक्री केली, तर उर्वरित 39,307 युनिट्सची निर्यात करण्यात आली. यासह, गेल्या महिन्यात होंडा दुचाकींची एकूण विक्री हीरो मोटोकॉर्पच्या जवळपास पोहोचली आहे. Hero MotoCorp ने गेल्या महिन्यात एकूण 4,62,608 मोटारींची विक्री नोंदवली.

होंडाच्या दुचाकींबद्दल बोलायचे झाले तर, बाइक्समध्ये होंडा शाइन (Honda Shine) आणि स्कूटरमध्ये होंडा अ‍ॅक्टिव्हा सर्वाधिक विकली जाते. कंपनीने अलीकडेच शाइनचे सेलिब्रेशन एडिशन लाँच केले आहे.

या एडिशनची किंमत 78,878 रुपये एक्स-शोरूम, दिल्ली ठेवण्यात आली आहे. शाइन सेलिब्रेशन एडिशन लाल आणि काळ्या रंगात आकर्षक गोल्डन पेंटसह ऑफर केले आहे. याशिवाय बाईकच्या रंगाप्रमाणेच सीटही बसवण्यात आली आहे.

ऑगस्टमध्येच, कंपनीने आपली सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर Activa 6G ची प्रीमियम आवृत्ती देखील लॉन्च केली आहे. कंपनीने ही स्कूटर 75,400 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) च्या किमतीत लॉन्च केली आहे.

ही स्कूटर टॉप-स्पेक Honda Activa DLX व्हेरियंटपेक्षा 1,000 रुपये जास्त महाग आहे. Honda Activa 6G स्टँडर्ड व्हेरिएंटच्या किंमती रु.72,400 (एक्स-शोरूम) पासून सुरू होतात.

Honda 2023 पर्यंत भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करू शकते. कंपनीचे अध्यक्ष अत्सुशी ओगाटा यांनी दिलेल्या माहितीनुसार, होंडाच्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत कंपनीच्या सध्या सर्वाधिक विक्री होत असलेल्या अ‍ॅक्टिव्हा स्कूटरपेक्षा स्वस्त असेल. याची किंमत 72,000 ते 75,000 रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असू शकते. होंडा 2030 पर्यंत तीन ई-स्कूटर मॉडेल लॉन्च करणार आहे.

सध्या जुन्या दुचाकी निर्मात्यांमध्ये फक्त बजाज आणि टीव्हीएस इलेक्ट्रिक स्कूटर विकत आहेत. दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत हिरो इलेक्ट्रिक आणि ओकिनावासह एथर, ओला इलेक्ट्रिक आणि प्युअर ईव्ही सारख्या स्टार्टअप्सचे वर्चस्व आहे.

होंडा व्यतिरिक्त यामाहा आणि सुझुकी सारख्या दुचाकी कंपन्या देखील इलेक्ट्रिक स्कूटर आणण्याच्या तयारीत आहेत. Hero MotoCorp 7 ऑक्टोबर रोजी त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर ब्रँड ‘Vida’ अंतर्गत पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरचे अनावरण करण्यासाठी सज्ज आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts