Disney+ Hotstar : अनेकजण Disney+ Hotstar चा वापर करतात. यावर चित्रपट, मालिका यांसह अनेक सामग्री उपलब्ध असते. शिवाय या प्लॅनची किंमतही कमी असते. त्यामुळे वापरकर्त्यांच्या पसंतीस Disney+ Hotstar उतरले आहे.
परंतु जर तुम्ही हे लोकप्रिय App वापरत असाल तर तुम्हाला त्याबाबत सर्व माहिती असावी. नाहीतर तुम्हाला आता आर्थिक फटका बसू शकतो. कारण आता Disney+ Hotstar ने आपल्या काही नियमांमध्ये बदल केले आहेत. त्याची तुम्हाला माहिती असावी. नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.
या प्लॅटफॉर्मने असे म्हटले आहे की 1 नोव्हेंबरपासून सर्व सदस्यांसाठी नवीन अटी आणि नियम लागू होणार आहेत. परंतु डिस्ने हॉटस्टारकडून पासवर्ड सामायिकरण कसे प्रतिबंधित केले जाईल हे अजूनही सांगण्यात आले नाही. पासवर्ड शेअर करण्याविरोधात कडक नियम केले जातील, असे निश्चित आहे. केवळ एकाच घरात राहणाऱ्या लोकांना पासवर्ड शेअर करता येईल.
खात्यांचा मागोवा घेतला जाणार
डिस्ने हॉटस्टारने कॅनडामधील आपल्या सदस्यांना असे सांगितले आहे की नवीन अद्यतनित विभागात ‘खाते सामायिकरण’ कंपनी वापरकर्त्यांच्या खात्यांचे परीक्षण कसे केले जाते हे स्पष्ट केले जाईल. त्यांनतर कंपनी खात्यांचा मागोवा घेईल. जर त्यांच्याकडून पॉलिसीचे उल्लंघन झाले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यांचा प्रवेश मर्यादित असेल किंवा त्यांचे खाते बंद केले जाईल.
भारतात लवकरच लागू केले जाणार
सध्या, कंपनीने नवीन बदल कॅनडामध्ये केले आहेत, परंतु लवकरच भारतासह इतर बाजारपेठांमध्ये असे बदल केले जाणार आहेत. सध्या, भारतीय वापरकर्त्यांसाठी विविध प्लॅनमध्ये स्क्रीन आणि व्हिडिओ गुणवत्तेची मर्यादा निश्चित केली आहे परंतु पासवर्ड शेअर करण्यावर कोणतीही बंदी नसणार आहे. कमी होत असणाऱ्या यूजर बेसमुळे कंपनीला सध्या त्याचा तोटा सहन करावा लागत आहे. नेटफ्लिक्सने अलीकडे पासवर्ड शेअरिंगशी निगडित बदलही केले आहेत.