Diwali 2022 : यावर्षी ऑक्टोबरमध्ये दिवाळीला (Diwali in 2022) सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे, यावर्षी या सणावर सूर्यग्रहणाच्या (Solar eclipse) छाया असणार आहे.
पुढच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये काही राशींवर (Zodiac signs) विशेष प्रभाव दिसून येणार आहे. पाहुयात या राशी नेमक्या आहेत तरी कोणत्या?
शनिदेव मार्गी
धनत्रयोदशीच्या (Dhantrayodashi) दिवशी शनिदेव मार्गस्थ होत आहेत. यामुळे अनेक राशींना फायदा होईल. त्याचवेळी दिवाळीच्या (Deepavali 2022) दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 ऑक्टोबरला (2022 diwali) सूर्यग्रहण आहे. अनेक राशींवरही याचा परिणाम होईल. याशिवाय 30 ऑक्टोबरला मंगळ मागे जात आहे, त्यामुळे अनेक ग्रहांवर त्याचा परिणाम होईल.
मेष –
या तीन ग्रहांच्या हालचालीचा मेष राशीवर शुभ प्रभाव पडेल. मेष राशीच्या लोकांना धनलाभ होईल आणि व्यवसायात खूप फायदा होईल. मात्र, या राशीच्या लोकांनी गुंतवणूक करताना काळजी घ्यावी लागेल.
कन्या –
कन्या राशीच्या लोकांवरही ग्रहांच्या हालचालींचा परिणाम होईल. या राशीच्या लोकांचे प्रेमसंबंध मजबूत असतील. त्याच वेळी, जर कोणी सरकारी नोकरीची तयारी करत असेल, तर त्याला कुठूनतरी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
तूळ –
तूळ राशीच्या लोकांना ग्रहांच्या चालीमुळे खूप फायदा होऊ शकतो. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. त्यामुळे प्रयत्न करत राहा.