Diwali Food and Recipe : या दिवाळीत घरी आलेल्या पाहुण्यांना खायला द्या ‘ही’ मिठाई, रेसिपीही आहे अगदी सोपी

Diwali Food and Recipe : आपल्या सर्वांचा आवडता सण (Diwali 2022) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सगळ्यांची सध्या दिवाळीच्या खरेदीची (Diwali Shopping) तयारी चालली आहे.

पाच दिवस चालणाऱ्या सणाला (Diwali in 2022) वेगवेगळ्या मिठाई (Diwali sweet) बनवल्या जातात. मिठाईशिवाय दिवाळी (Diwali Food) हे समीकरण जुळतच नाही. त्यामुळे या दिवाळीत घरी आलेल्या पाहुण्यांना खव्याच्या करंज्या खायला द्या,याची बनवण्याची पद्धतही खूप सोपी आहे.

खव्याच्या करंज्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

सारण तयार करण्यासाठी

– 2/3 कप खवा
-1/2 कप वाळलेले अंजीर
-1/2 कप खजूर, तुकडे करा
-10 काजू
– 3 चमचे तूप
– तळण्यासाठी तेल
-10 बदाम, तुकडे करा
-10 अक्रोडाचे तुकडे

खव्याच्या करंज्या बनवण्याची पद्धत-

खव्याच्या करंज्या बनवण्यासाठी सर्वप्रथम मैद्यात तूप आणि पाणी घालून थोडे घट्ट पीठ मळून घ्या आणि पीठ सुती ओल्या कपड्याने 15 मिनिटे झाकून ठेवा. आता फिलिंग बनवण्यासाठी नॉनस्टिक पॅनमध्ये खवा घालून 3 मिनिटे भाजून घ्या आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. अंजीर, काजू, अक्रोड, बदाम घालून मिक्स करा.

मैद्याचे छोटे गोळे करून पुरींच्या आकारात लाटून, तयार केलेले सारण मधोमध भरून, कडांना पाणी लावून चांगले बंद करून करंज्याचा आकार द्या. कढईत तेल गरम करून करंज्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. करंज्या पूर्णपणे थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवू शकता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts