Diwali Offer : देशात दिवाळी सणाला सर्वात जास्त महत्व दिले जाते. तसेच दिवाळी मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अनेक जण सोन्या चांदीचे दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि गाड्या खरेदी करत असतात. तुम्हालाही होंडा बाईक (Honda bike) खरेदी करायची असेल तर मोठी ऑफर मिळू शकते.
होंडा मोटारसायकल (Honda Motorcycle) अँड स्कूटर इंडिया (HMSI) ही भारतातील दुसरी सर्वात मोठी दुचाकी कंपनी आहे. हीरो नंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी विक्री आहे. आता दिवाळीच्या मुहूर्तावर उत्तम ऑफर्स देत आहे.
ऑफर अंतर्गत, ग्राहक झिरो डाउन पेमेंट (Zero down payment) आणि नो कॉस्ट ईएमआयवर (No Cost EMI) स्कूटर आणि मोटरसायकल खरेदी करू शकतात. याचा अर्थ ग्राहक कोणतेही पैसे न भरता बाईक किंवा स्कूटर घरी घेऊन जाऊ शकतात. HMSI ऑफर 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत वैध आहे. या अंतर्गत कंपनीच्या सर्व मॉडेल्सचा लाभ घेता येईल.
याशिवाय होंडाच्या मोटरसायकल आणि स्कूटरवरही कॅशबॅक दिला जात आहे. 50,000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर 5000 रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर आहे. आयडीएफसी फर्स्ट बँक क्रेडिट कार्डवरून ईएमआय करून ग्राहक याचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय ही कॅशबॅक ऑफर स्टँडर्ड चार्टर्ड बँक, फेडरल बँक आणि बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठीही उपलब्ध आहे.
जरी, ऑफरमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की झिरो डाउन पेमेंट आणि नो कॉस्ट ईएमआय ऑफर आहे परंतु वाहन खरेदीच्या वेळी ही ऑफर कोणाला मिळते आणि कोणाला नाही हे फायनान्सिंग कंपनीवर अवलंबून असते. वित्तपुरवठा करणारी कंपनी तिच्या धोरणानुसार डाउनपेमेंटची रक्कम ठरवते.
विशेष म्हणजे होंडा टू-व्हीलर भारतीय बाजारपेठेत घट्टपणे टिकून आहे. सप्टेंबर 2022 मध्ये कंपनीने एकूण 5.18 लाख दुचाकी विकल्या, तर सप्टेंबर 2021 मध्ये ही संख्या 4.88 लाख होती. त्याची विक्री वार्षिक आधारावर 7.6% वाढली आहे. आता कंपनीने सणासुदीच्या काळात विक्रीला आणखी गती देण्यासाठी ऑफर आणल्या आहेत.