ताज्या बातम्या

DIZO Smartwatch : DIZO ने लाँच केले भन्नाट फीचरसह दोन स्मार्टवॉच, जाणून घ्या डिटेल्स

DIZO Smartwatch : सध्या स्मार्टवॉचची क्रेझ सुरु आहे. त्यामुळे प्रत्येकालाच आपल्याकडेही जबरदस्त फीचर्स असणारे स्मार्टवॉच असावे असे वाटते. जर तुम्ही आता स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे.

कारण DIZO ने कॉलिंग फीचरसह दोन नवीन स्मार्टवॉच लाँच केले आहेत. यामध्ये कंपनी AMOLED डिस्प्ले देत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे स्मार्टवॉच तुम्ही कमी किमतीत खरेदी करू शकता.

DIZO Watch D Pro चे स्पेसिफिकेशन्स

DIZO Watch D Pro सह कंपनीचा चिपसेट DIZO D1 आहे आणि याशिवाय DIZO OS आहे. स्मार्टवॉचच्या डिस्प्लेचा रिफ्रेश दर 60Hz आहे. नवीन चिपसह, स्मार्टवॉचमध्ये आर्ट फिल्टर, वॉच फेस कस्टमायझेशन सारखी भन्नाट फीचर्स मिळत आहेत.

यामध्ये वाऱ्याचा वेग, संपूर्ण हवामान माहिती आणि UV इंडेक्स यासारखी अपडेट्स उपलब्ध असणार आहेत. तुम्ही स्मार्टवॉचमधून फोनचा कॅमेरा देखील नियंत्रित करू शकता. आरोग्य फीचर्स, हृदय गती, SpO2 मॉनिटर सारखी वैशिष्ट्ये DIZO OS सह उपलब्ध असणार आहेत.

600 nits च्या ब्राइटनेससह 1.85-इंचाचा डिस्प्ले आहे. डिस्प्लेवर 2.5D वक्र ग्लास आहे. स्मार्टवॉच सिलिकॉन पट्ट्यासह येते. हे स्मार्टवॉच क्लासिक ब्लॅक, सिल्व्हर ग्रे आणि लाइटनिंग ब्लू रंगांमध्ये खरेदी करता येणार आहे.

स्मार्टवॉचसोबत 150 पेक्षा जास्त वॉच फेस उपलब्ध असतील. तुम्ही आता स्मार्टवॉचसोबत फोनवरही बोलू शकता. हे स्मार्टवॉच 270mAh बॅटरी पॅक करते ज्याचा 7 दिवसांपर्यंत बॅकअप देत ये असा दावा कंपनी करत आहे. स्मार्टवॉचमध्ये इनबिल्ट जीपीएस नाही. हे स्मार्टवॉच 17 जानेवारीपासून 2,699 रुपयांच्या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध होईल.

DIZO Watch D Ultra चे स्पेसिफिकेशन्स

या स्मार्टवॉचमध्ये 1.78 इंच AMOLED डिस्प्ले आहे, ज्याची ब्राइटनेस 500 nits आहे. त्याच्या डिस्प्लेवर 2.5D वक्र टेम्पर्ड ग्लास देखील आहे. या स्मार्टवॉचचे वजन 42 ग्रॅम असून त्याच्यासोबत सिलिकॉनचा पट्टाही उपलब्ध असेल.

हे स्मार्टवॉच क्लासिक ब्लॅक, सिल्व्हर ग्रे आणि ओशन ब्लू रंगांमध्ये खरेदी करता येईल. या स्मार्टवॉचमध्ये कॉलिंग फीचर देखील आहे. यात 270mAh बॅटरी आहे जी कॉलिंगसह 7 दिवसांचा बॅकअप देते.

कंपनी यात 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड मिळतील. DIZO Watch D Ultra ची किंमत 3,299 रुपये इतकी आहे आणि ते 12 जानेवारीपासून विक्रीसाठी सुरू होणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts