Marathi News : दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याच्या अफवांमुळे नागरिकांसह व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. बऱ्याच ठिकाणी हे नाणे स्विकारले जात नसल्याने, जमा झालेल्या नाण्यांचे काय करावे, असा प्रश्न नागरिकांसह वापाऱ्यांसमोर आहे. हे नाणे बँकेतदेखील स्विकारण्यास टाळाटाळ केली जाते. याबाबत योग्य तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
दहा रुपयांचे नाणे व्यवहारातून बंद झाले नाही, हे वारंवार सांगितल्यावरही नाणी बंद झाल्याच्या अफवांवर विश्वास ठेवूननागरिक कुणाकडूनही दहा रुपयांचे नाणे स्विकारत नाहीत तसेच व्यावसायिकांनी स्विकारल्यावर ग्राहक त्यांच्याकडून स्विकारीत नाहीत.
या प्रकारामुळे नागरिक व व्यावसायिक चांगलेच अडचणीत आले आहेत. ग्रामीण भागासह शहरातह हा प्रकार दिसून येत आहे. नागरिकांसह छोटे-मोठे व्यावसायिक, फेरीवाले, आठवडे बाजारातील किरकोळ व्यापाऱ्यांनी यापूर्वी दहा रुपयांची नाणी स्विकारली आहेत.
मात्र आता ग्राहक त्यांच्याकडूनही नाणी घेत नसल्याने त्यांच्याकडे हजारो रुपयांची नाणी जमा झालेली आहेत. नाणी स्विकारण्याबाबत जनजागृती करून नाणे बंद झाल्याची अफवाथांबवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
दहा रुपयाचे नाणे स्विकारण्यास सर्वत्र नकार मिळत असून, हा राजमुद्रेचा अवमान आहे. बँकांनी व प्रशासनाने याकडे डोळेझाक केल्याने नागरिकांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. दहा रुपयाचे नाणे स्विकारण्यास सर्वत्र चक्कर ,मिळत असल्याने सदर नाणी बंद झाल्याची अफवा पसरली आहे;
परंतु दहा रुपयांचे नाणे सुरुच असून, ते चलनाचा एक भाग आहेत, असा निर्वाळा रिझर्व्ह बँकेने दिला असला तरी, किरकोळ व्यावसायिक तसेच ग्राहकांकडून दहा रुपयांचे नाणे स्विकारण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.