Alert : अनेकदा युजर्संना अॅप इन्स्टॉल करत असताना खतरनाक अॅप्स कोणते आहे याची माहिती मिळत नाही. त्यामुळेच त्यांच्या फोनमध्ये खूप अॅडवेअर आणि मेलवेअर अॅप्स इन्स्टॉल होत असतात. सर्वात धक्कादायक म्हणजे युजर्संना याची माहिती सुद्धा नसते की, हे अॅप्स त्यांच्या स्मार्टफोनला किती नुकसान पोहोचू शकतात.
जर हे अॅप्स तुमच्या स्मार्टफोनमध्ये असतील तर ते लगेच डिलीट करा. ते खतरनाक अॅडवेअर आणि मेलवेअर असून तुमच्या स्मार्टफोनच्या परफॉर्मन्सवर खूप परिणाम करीत असतात. हे अॅप्स कोणते आहेत ते कितपत धोकादायक आहेत ते जाणून घेऊयात.
हे अॅप्स इन्स्टॉल करू नका
क्रमांक १
स्मार्टफोनवर वेगवेगळे अँटीव्हायरस अॅप इन्स्टॉल करण्याची चूक करू नका. फ्री अँटीव्हायरसच्या नावाखाली अनेकजण असे अॅप्स इन्स्टॉल करतात. पण कारण हे अॅप तुमच्या मोबाईलमधील डेटा चोरण्याचं काम करतात.
क्रमांक २
मोबाईलमध्ये कधीही टॉर्च किंवा टॉर्च अॅप इन्स्टॉल करू नका. वैशिष्ट्यांमुळे लोक हे अॅप इन्स्टॉल करतात. अॅप्स मोबाईल वापरकर्त्यांची वैयक्तिक आणि गोपनीय माहिती चोरतात.
क्रमांक ३
अनेकजण त्यांच्या मोबाईलमध्ये वेगळा कीबोर्ड अॅप इन्स्टॉल करतात. पण सुरक्षेच्या दृष्टीने ते योग्य नाहीत. टायपिंग दरम्यान असे बनावट अॅप वापरकर्त्याचा पासवर्ड चोरतात.
क्रमांक ४
असे अनेक मोबाइल अॅप्स आहेत जे दावा करतात की ते तुमचा मोबाइल साफ करतील आणि कॅशे आणि जंक फाइल्स काढून टाकतील. परंतु यात अनेक बनावट अॅप्स आहेत, जे तुमच्याकडून परवानगी घेऊन फसवणूक करतात.