Cibil Score : आता अनेक कंपन्या तुम्हाला मोफत क्रेडिट स्कोर देत आहेत. परंतु, जर तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर सतत तपासत असाल तर आजच ही सवय सोडा. कारण तुमची ही सवय तुमच्या कर्जाला अडथळा निर्माण करू शकते. परिणामी तुम्हाला कर्ज मिळणार नाही.
सध्याच्या काळात बँकेकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज घेत असताना तुमचा क्रेडिट स्कोअर खूप उपयुक्त ठरत आहे. जर तुमचा क्रेडिट स्कोअर 700 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर बँका सहज कर्ज देतात, परंतु कर्ज घेण्यापूर्वी एक छोटेसे काम करा. तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही.
पेटीएम वरून सिबिल स्कोअर विनामूल्य तपासा
स्टेप 1
- जर तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर अगोदर तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर तपासू शकता
- सर्वप्रथम यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पेटीएम अॅप डाउनलोड करून तुमच्याकडे आधीच अॅप असेल तर ते अपडेट करावे लागणार आहे.
- आता अॅप उघडा
स्टेप 2
- त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर आणि पासवर्ड किंवा ओटीपीच्या मदतीने अॅपमध्ये लॉग इन करावे लागणार आहे.
- लॉगिन केल्यानंतर, तुम्हाला येथे अनेक गोष्टी दिसतील, ज्यात तुम्हाला अनेक सेवा दिसतील.
स्टेप 3
- त्यानंतर सर्च ऑप्शनवर जा आणि फ्री क्रेडिट स्कोर लिहून सर्च करावे लागणार आहे.
- तुम्ही हे करताच हा पर्याय तुमच्या समोर येईल, त्यावर क्लिक करावे लागणार आहे.
स्टेप 4
- यानंतर, तुम्हाला त्यात तुमची जन्मतारीख, मोबाइल नंबर आणि पॅन कार्ड क्रमांक भरावा लागणार आहे.
- आता सर्व माहिती भरा, त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे लागणार आहे.
- हे केल्यानंतर तुम्हाला तुमचा CIBIL स्कोर समजेल आणि तुम्हाला कर्ज मिळेल की नाही हे समजू शकेल.